आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरतचे दीपक चौकसी यांचा रोज गायीसोबत मॉर्निंग वॉक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - सकाळी ६.३० चे हे दृश्य. एक कुटुंब त्यांच्या गायीला घेऊन कुठे तरी जात आहे असे वाटते. मात्र, हे दृश्य रोजच पाहावयास मिळते. सुरतचे ज्वेलरी डिझायनर दीपक चौकसी गौरी नावाच्या आपल्या आवडत्या गायीला तिच्या नंदी नावाच्या वासरासह मॉर्निंग वॉकला घेऊन जातात. जॉगिंग ट्रॅकवर ते या गायीला नेतात. हे दृश्य पाहणा-यांनाही चकित करते. काही लोक विचारतात, तुम्ही गायीसोबत मॉर्निंग वॉकला का जाता? यावर दीपक स्मितहास्य करतात व निघून जातात. जुनागडमध्ये राहत असताना आजोबांसोबत ते गोशाळेत जात असत. तेव्हापासून त्यांना गायींबद्दल प्रचंड प्रेम आहे. गायींना ते कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणे जपतात.