आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11 AGAIN? पोरबंदरजवळ पाकिस्तानी नौका, पाठलागानंतर चौघांचा आत्मघातकी स्फोट, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- पाकिस्तानमधून आलेल्या संशयित नौकेवर अशा प्रकारे स्फोट घडवून आणण्यात आला.)
गांधीनंगर - नववर्षाच्या पहाटे गुजरातमधील पोरबंदरजवळ असलेल्या समुद्रात पाकिस्तानची एक संशयित नौका आढळून आली होती. विशेष म्हणजे कोस्टगार्डच्या जवानांनी या नौकेचा तब्बल तासभर पाठलाग केला. त्यानंतर या नौकेतील चौघांनी स्वतःला उडवून दिले. या नौकेत स्फोटके होते असे समजते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठीही 10 दहशतवादी असेच समुद्रमार्गे आले होते.

31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडलेली असून ती आज उघड झाली आहे. पोरबंदरजवळ ही संशयित नौका आढळून आली होती. ही नौका मच्छिमारांची असल्याचे सांगितले जात होते. पण या संशयित नौकेवर मोठ्या प्रमाणावर स्फोटके असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोस्टगार्डला संशय आल्यानंतर त्यांनी या नौकेचा पाठलाग केला.
वारंवार इशारा देऊनही त्यांचा पळ काढण्याचा प्रयत्न सुरुच होता. बराच वेळ त्यांनी पाठलाग केला तरी देखील ही नौका हाती लागली नाही. काही वेळातच नौकेवर भीषण स्फोट झाला. याच्या उंच ज्वाळा दुरुनही सहज दिसून येत होत्या. यावेळी नौकेवर चार लोक होते. ही नौका कराची जवळच्या केती बंदरावरची होती, अशीही माहिती मिळत आहे.
दरम्यान, नौकेतील संभाव्य जिवंत लोकांचा शोध घेतला जात असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. ही नौका आणि यातील चौघांचे मृतदेह अद्याप सापडले नसल्याचे समजते.
मुंबई हल्ल्यातही झाला होता समुद्री मार्गाचा वापर
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी सागरी मार्गाचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर सागरी सुरक्षेच्याबाबतीत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले होते. तरीही संशयितांची नौका पोरबंदरपर्यंत घुसण्यात यशस्वी झाली आहे. ही नौका पाकिस्तानाचीच असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाच्या बाबतीत अजूनही गांभीर्याने कारवाई करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पेशावर हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेणार असल्याचे म्हटले होते. मात्र, ती केवळ वल्गना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या नौकेची काही छायाचित्रे... कुठे सापडली होती नौका....