आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये तंबूच्या शाळेत टॅबचे अप्रूप; एनजीआेच्या वतीने ‘झीरो कनेक्ट’ कार्यक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- येथून १८० किलोमीटर अंतरावरील मीठ प्रकल्पावर कामगारांची मुले अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. या समुदायाला त्यांचा हक्क मिळावा यासाठी एका एनजीआेच्या वतीने ‘झीरो कनेक्ट’ कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत अलीकडेच इंटरनेट कनेक्टेड व्हॅन प्रदेशातील तंबू शाळेत दाखल झाली होती.
 
मुलांनी आधुनिक शिक्षणाचा श्रीगणेशा करताना आधी टॅब काय आहे, त्याचे फीचर्स, तो वापरायचा कसा हे जाणून घेतले. कार्यशाळेच्या निमित्ताने ही मुले काही क्षण का होईना नव्या जगाशी जोडली गेली होती.

अाठ महिने खडतर परिस्थिती...
कच्छच्या भागात कामगारांना वर्षातील आठ महिने अत्यंत खडतर परिस्थितीत काढावे लागतात. त्याही परिस्थितीत तंबूतील शाळा हाच त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाचा एकमेव आधार असतो.
बातम्या आणखी आहेत...