आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tantra Mantra On Woman In Civil Hospital In Gujarat

मोदींच्या गुजरातमध्ये मृत महिलेला जिवंत करण्यासाठी तंत्र-मंत्रांचा वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाहोद (गुजरात)- मृत महिलेला जिवंत करण्यासाठी तंत्र-मंत्रांचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे स्थानिक सरकारी रुग्णालयातील पोस्टमॉर्टम रुममध्ये हा प्रकार झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव जानीबहन महेशभाई बबेरिया (वय 35) असे आहे. ती घरी झोपली होती. तिच्या घराचे छत कौलारुंचे आहे. यावेळी एक विषारी साप तिच्या अंगावर येऊन पडला. त्याने तिला दंश केला. याची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यावर तिला ओझा नासिर खान पठाण नावाच्या तांत्रिकाकडे नेण्यात आले. परंतु, तिची प्रकृती गंभीर झाली होती. त्यानंतर त्याने तिला सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे नातलगांनी तिला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमॉर्टम रुममध्ये नेण्यात आला. यावेळी पुन्हा ओझाला बोलविण्यात आले. त्याने सुमारे तासभर तिच्यावर तंत्र-मंत्र केले.
या मांत्रिकाने दावा केला आहे, की मी तंत्र-मंत्र करीत असताना मृत्युमुखी पडलेल्या जानीबहनने दोन वेळा डोळे उघडले होते. डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या महिलेने डोळे उघडले, असे सांगणारा मांत्रिक किती माथेफिरु आहे हे यावरुन लक्षात येते.
आरएमओ म्हणाले हास्यास्पद आहे घटना
या सरकारी रुग्णालयाचे आरएमओ डॉ. एस. व्ही. कटारा म्हणाले, की जानीबहन यांना सर्पदंश झाला होता. त्यांना मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. सर्पदंश झाल्यावर तिला लगेच रुग्णालयात आणले असले तर जीव वाचला असता. पण तिला मृतावस्थेतच येथे आणले. त्यानंतर ओझाने तंत्र-मंत्र केल्याची माहिती माझ्या कानांवर पडली आहे. हे सगळेच हास्यास्पद आहे. अशा महिलेला ओझाकडे नेण्याचा काय अर्थ...
पुढील स्लाईडवर बघा, कसे करण्यात आले तंत्र-मंत्र.... मांत्रिकाने केला दावा...