आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teacher Allegedly Said To Girl Student, I Want To See You Without Cloths

शिक्षक विद्यार्थीनीला म्हणायचा, तुला कपड्यांविना बघायचे आहे, छेड काढायचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अहमदाबादच्या एका शाळेत घडली आहे. शहरातील प्रतिष्ठित नारायण गुरु विद्यालयातील शिक्षक एका विद्यार्थीनीला कायम शारीरिक त्रास देत होता. प्रारंभी तिने याची माहिती कुणाला दिली नाही. पण जेव्हा शिक्षकाची मागणी वाढली तेव्हा तिने पालकांना सांगितले. पालकांनी शिक्षकाविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे.
आठ वर्षीय विद्यार्थीनी पायल (नाव बदललेले) नारायण गुरु विद्यालयातील इंग्रजी माध्यमातील तिसऱ्या वर्गात शिकते. या विद्यालयातील सचिन सर तिला कायम शारीरिक त्रास देत होता. गेल्या काही दिवसांमध्ये हा त्रास खुप वाढला होता. वर्गात शिकवताना सचिन पायलच्या शरीरावर हात फिरवायचा. काही वेळा प्रायव्हेट पार्टला हात लावायचा. यामुळे पायल संपूर्ण प्रकाराने प्रचंड घाबरली होती. तिने सुरवातील, मला हे आवडत नाही, असे करीत जाऊ नका, असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण सर काही ऐकत नव्हता.
अखेर तिने आईकडे तक्रार केली. हा सगळा प्रकार ऐकून तिची आई सुन्नच झाली. तिने पायलच्या वडीलांना याची माहिती दिली. वडीलांनी घरातील ज्येष्ठांना सांगितले. त्यानंतर पायलच्या कुटुंबीयांनी पोलिस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाईडवर वाचा, सचिन सर पायलला म्हणायचा... तुला कपड्यांविना बघायचे आहे...