आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांच्या मुलाला घेऊन फरार झालेली 38 वर्षांची शिक्षिका पैसे संपल्यानंतर परतली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 दिवस केलेल्या मौजमस्तीनंतर त्यांच्याजवळची सर्व जमापुंजी संपली त्यानंतर त्यांना घराची आठवण झाली - Divya Marathi
11 दिवस केलेल्या मौजमस्तीनंतर त्यांच्याजवळची सर्व जमापुंजी संपली त्यानंतर त्यांना घराची आठवण झाली
अहमदाबाद - 38 वर्षांची ट्यूशन टिचरने 15 वर्षांच्या मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि फरार झाली होती. वस्त्राल येथील ही महिला 11 दिवस किशोरवयीन मुलाला घेऊन मुंबई, राजस्थान आणि माऊंट आबूला फिरून पैसे संपल्यानंतर अहमदाबादला परतली आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

महिला शिक्षिकेविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा
वस्त्राल रिंगरोड येथून फरार झालेल्या दोघांना रामोल पोलिसांनी ते स्वतः अहमदाबादला परत आल्यानंतर अटक केली आहे. राज्यातील हे कदाचित पहिलेच प्रकरण असले पाहिजे की पोलिसांनी एका महिलेविरोधात पोक्सा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रामोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक परेश सोलंकी यांनी सांगितले, की एक जूनच्या सायंकाळी महिलेने विद्यार्थ्याला फोन करुन कबीर मंदिराजवळ बोलावून घेतले होते. तेथूनच दोघे फरार झाले होते. सुरुवातीला दोघे मुंबई, तेथून राजस्थानला गेले. तिथे ते सुधा माता मंदिर, भीन्नमान आणि श्यामगिरी माता मंदिर येथे रात्रीचा मुक्काम करत होते. काही दिवस माऊंट आबू येथेही त्यांनी मुक्काम केला होता. 11 दिवस केलेल्या मौजमस्तीनंतर त्यांच्याजवळची सर्व जमापुंजी संपली त्यानंतर त्यांना घराची आठवण झाली. 11 दिवसानंतर शिक्षिका आणि तिचा विद्यार्थी अहमदाबादला परतले.

शिक्षिका सांगत होती हा माझा मुलगा
- मुंबई आणि राजस्थान मध्ये अनेक ठिकाणी त्यांना विचारणा झाल्यानंतर शिक्षिका सोबत पळवून आणलेल्या मुलाला स्वतःचा मुलगा असल्याचे सांगत होती.
- पोलिसांनी सांगितले, की तीन वर्षांपूर्वीही महिला शिक्षिका एका युवकासोबत पळून गेली होती आणि 10 दिवसानंतर परतली होती.
असे आहे प्रकरण
- मनीषा चौधरी या ट्यूशन टिचरने ईश्वर प्रजापती या दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थाला फूस लावून पळवून नेले होते. ईश्वर हरवल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी दिली होती.
- मनीषा होम ट्यूशन घेते. ती ईश्वरला घरी येऊन शिकवत होती. तिला स्वतःची तीन मुले आहेत.

गुजरातमध्ये प्रथमच एखाद्या महिलेवर पोक्सो
'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स अॅक्ट 2012' अर्थात पोक्सो अंतर्गत पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याआधी 10 ऑक्टोबर 2014 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे एका 31 वर्षीय महिलेविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पत्नीच्या पाठीशी उभा राहिला पती
मनीषा जोशीचा पती कानू जोशीने पत्नीवर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. त्याचे म्हणणे आहे, की मनीषा आणि ईश्वर एकाच दिवशी बेपत्ता झाले हे खरे असले तरी मनीषाने ईश्वरला पळवले हे खोटे आहे. सोसायटीमधील अनेक मुलांची माझ्या पत्नीकडे शिकवणी आहे. ती हिस्टीरियाची रुग्ण आहे. त्यामुळेच ती घर सोडून गेली असल्याचा दावा कानू जोशीने केला. जोशीने पत्नी हरवल्याची तक्रारही पोलिस स्टेशनमध्ये दिली होती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, शिक्षिका आणि 15 वर्षांच्या विद्यार्थ्याचे आणखी फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...