आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teesta Setalvad\'s Depiction Of ISIS Militants Draws Blood On Twitter

तिस्ता सेतलवाड यांनी हिंदू देवीवर लावले ISIS प्रमुखाचे शीर, लागले ऑनलाईन फटके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- तिस्ता सेतलवाड यांच्या अकाऊंटवरुन टाकण्यात आलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट. यावरुन वाद सुरु झाल्यानंतर सेतलवाड यांनी ट्विट डिलीट केली.)
नवी दिल्ली- सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार तिस्ता सेतलवाड यांनी ट्विटरवर टाकलेल्या एका ट्विटवरुन आज (शुक्रवार) चांगलाच ऑनलाईन गोंधळ उडाला. त्यांनी हिंदू देवी कालीची तुलना ISIS चा प्रमुख अबू बकर अल-बगदादी याच्याशी केली. यानंतर नेटिझन्सनी सेतलवाड यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर सेतलवाड यांनी केवळ ही ट्विट डिलिट केली नाही तर जाहीर माफीही मागितली आहे.
एका फोटोत ISIS चा दहशतवादी सुदर्शन चक्र घेऊन दिसत आहे. दुसऱ्या छायाचित्रात हिंदू देवी कालीच्या डोक्यावर अबू बकर अल-बगदादीचा फोटो लावला आहे. यावरुन संतप्त झालेल्या नेटिझन्सनी सेतलवाड यांना अटक करण्याची मागणी केली आहे. सेतलवाड यांनी माफी मागताना म्हटले, की कोणाच्याही भावनांशी खेळायला नको.
तिस्ता सेतलवाड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधक समजल्या जातात. त्या सिटिजन्स ऑर जस्टिस अॅण्ड पीस या संघटनेच्या सचिव आहेत. गुजरात दंगल प्रकरणी मोदींविरुद्ध खटला चालवण्याची मागणी त्यांनी केली होती.
पुढील स्लाईडवर बघा, सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रिया...