आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातचा नवा नजराणा : राज्यातील सर्वाधिक लांबीचा अंडरपास ब्रिज वाहतूकीसाठी खुला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - अहमदाबादचे नागरिक जो मार्ग खुला होण्याची आतुरतेने वाट पाहात होते, त्या थलतेज अंडरपास ब्रिजचे सोमवारी लोकार्पण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 64 कोटी रुपये खर्च करुन थलतेज ग्रेड सेप्रेटर (अडरपास) तयार केला आहे. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आता बोपल जंक्शन येथे सहा पदरी फ्लायओव्हरचे काम सुरु होणार आहे.

गुजरातच्या विकासाचा डंका वाजवून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आरुढ झाले आहेत. ते केंद्रात गेल्यानंतरही गुजरातच्या पायाभूत विकासाची काम अजूनही त्याच वेगाने सुरु आहेत, जी ते मुख्यमंत्री असताना होत होती. आता आनंदीबेन पटेल राज्याच्या मुख्यमंत्री आहेत.
थलतेज क्रॉस रोड ते सिंधुभवन क्रॉस रोड हा 2.25 किलोमीटर लांबीचा गुजरातमधील सर्वात मोठा अंडरपास मार्ग आहे. त्याच्या निर्मीतीला दीड वर्षांचा कालावधी लागला आहे. शहरातली सर्वाधिक रहदारीच्या भागात तयार करण्यात आलेला हा मार्ग खुला झाल्याने नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अंडरपास ब्रिजची आणखी छायाचित्र