आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: 11 फुट पाण्यात बुडाले होते 6 हजार लोकसंख्येचे गुजरातमधील हे गाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातमधील अमरेली असे पुराच्या पाण्याखाली होते. - Divya Marathi
गुजरातमधील अमरेली असे पुराच्या पाण्याखाली होते.
राजकोट (गुजरात)- गेल्या वर्षी गुजरातच्या सौराष्ट्रात मुसळधार पावसाने अगदी थैमान घातले होते. यानंतर आलेल्या महापुरात जनजीवन फार मोठ्या प्रमाणावर विस्कळित झाले होते. आशियायी सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या अमरेली जिल्ह्यात तर वन्यजिवांनाही त्याचा फटका बसला होता. अनेक सिंह आणि इतर वन्यप्राणी यात मृत्युमुखी पडले. दरम्यान, या महापुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्याही 70 वर गेली होती तर 9 हजारांवर प्राणी या पुरामुळे मृत्यूमुखी पडले. येथील 6 हजार लोकसंख्या असलेले बाबापूर तर काही दिवस अक्षरशः 11 फुट पाण्यात बुडाले होते.

या महापुराने अमरेली जिल्ह्यातील बाबापूर सर्वांत जास्त प्रभावित झाले होत. येथे 24 तासांमध्ये 24 इंच एवढ्या पावसाची नोंद केली गेली. गावाशेजारुन वाहणाऱ्या नद्यांना पूर आल्याने या गावातील घरे तब्बल 11 फुट पाण्याखाली गेली होती. पुराची पातळी वाढण्यापूर्वी गावातील नागरिक सुरक्षित स्थळी गेल्याने मोठी जिवित हानी वाचली. तरीही गावातील 12 लोकांचा या पूरात मृत्यू झाला होता. या पुरामुळे तर गावातील 80 टक्के इमारती जमिनदोस्त झाल्या. बाबपूरसह पाणिया आणि खारी गावेही उध्वस्त झाली आहेत.

पुढील स्लाईडवर बघा, गुजरातच्या सौराष्ट्रात आलेल्या महापूरात बाबापूरची अशी झाली होती अवस्था...
बातम्या आणखी आहेत...