आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातेत बँकेच्या चुकीमुळे 48 हजारांचे झाले 48 कोटी, तीन कोटींची कबुली, सहा कोटींचा हिशेब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - नोटाबंदीच्या काळात बँकांनी ओव्हरलोड काम केल्यामुळे याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. सुरतमधील कामरेज येथे एका शेतकऱ्यासह जमीनविक्रीच्या दलालाने नोटाबंदीच्या काळात बँकेत ४८ हजार रुपये जमा केले. तथापि बँकेने आयकर विभागाला ही माहिती कळवली. तेव्हा जमीनविक्रीच्या दलालाच्या खात्यातील जमा रकमेवर चार शून्ये बँकेतून वाढवली गेली होती. बँकिंगच्या माध्यमातून आयकर खात्याचे या नोंदीवर लक्ष जाताच त्यांनी पावले उचलली. शुक्रवारी कामरेज -सुरतमधील खातेधारकाकडे चौकशीसाठी एक पथक पोहोचले. खातेधारकाने बँकेत जमा केलेल्या रकमेची माहिती पथकासमोर सादर केली तेव्हा आयकर अधिकाऱ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला.  

किसान आणि त्या दलालाच्या बाबतीत घडलेला हा एकमेव किस्सा नाही. सुरतमधील वराछा भागात असलेल्या पगारदार व्यक्तीसही या चक्रातून जावे लागले. त्याने ४० हजार रुपये जमा केले. बँकेने या रकमेवर शून्य वाढवले. त्यामुळे चार लाख रक्कम झाली. आयकर विभागाने त्यास नोटीस पाठवली. त्याने आयकर विभागास तपशील दिला.
 
तीन कोटींची कबुली, सहा कोटींचा हिशेब 
आयडीएस योजनेंतर्गत तीन कोटी रुपये जाहीर केले. पण बँकेच्या खात्यात चुकून ६ कोटी रुपयांची नोंद झाली. आयकर विभागाने खातेधारकास नोटीस पाठवली तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला. नोटाबंदीच्या काळात पाच लाख रुपये जमा करणाऱ्या कोंबड्याच्या विक्रेत्यास आयकर विभागाच्या सर्वेक्षणाच्या कारवाईस सामोरे जावे लागले. आयकर अधिकारी दिवसभर चौकशी करत होते. परंतु हाती काहीच न लागल्याने त्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. या व्यापाऱ्याने ४४ एडीनुसार रिटर्न दाखल केले, तर  उलाढालीवर ८ टक्क्यांनी हिशेब द्यावा लागेल. हा व्यापारी महाराष्ट्रातील धुळे येथून कोंबड्या आणून विकतो. 
 
बातम्या आणखी आहेत...