आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्धीसाठी डॉक्टरने रचली इसिसच्या धमकीची कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद-सौराष्ट्रातील संशोधक आणि चिकित्सक डॉ. मुकेश शुक्ला यांच्यावर काही रासायनिक हल्ला झालेला नाही. उलट त्या डॉक्टरनेच एक कथानक रचून सर्व नाटक केल्याचे उघडकीस आले. अहमदाबाद पाेलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून डॉ. शुक्ला यांना अटक केली आहे.  

आरोपीने स्वत:ला प्रसिद्धी मिळावी या हव्यासापोटीच  नाटक रचले.  त्यांनी या नाटकात इसिस या दहशतवादी संघटनेचे नाव घेतले. इतकेच नव्हे, तर त्या डॉक्टरने स्वत:ला जे धमकीचे पत्र मिळाले ते पत्रसुद्धा स्वत: डॉक्टरनेच लिहिले होते. अरबी भाषेत पत्र लिहिण्यासाठी त्याने गुगल ट्रान्सलेटची मदत घेतली होती. डॉ. शुक्ला हे एचआयव्हीसह अन्य रोगांवर औषधाचे संशोधन करत आहेत. गेल्या २८ वर्षांपासून यावर संशाेधन करत असून कोणाचेही याकडे लक्ष वेधले गेले नाही. यामुळे निराश होऊन त्यांनी लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधले जावे म्हणून स्वत:वर रासायनिक हल्ला झाल्याचे नाटक रचले.  
 
स्वसंरक्षण करण्याचा स्प्रे : डॉ. शुक्ला यांच्यावर जो पातळ पदार्थ फेकण्यात आला होता ते रसायन नसून स्वसंरक्षणासाठीचा स्प्रे आहे. हा स्प्रे डॉक्टरने एका शॉपिंग मॉलमधून विकत घेतला होता. २१ एप्रिल रोजी डॉ. शुक्ला यांच्यावर रासायनिक हल्ला झाल्याचे कुभांड रचले गेले. या दिवशी ते क्लिनिकमधून घरी 
परतत होते. 
बातम्या आणखी आहेत...