आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात : वेगाने घेतला तरुणांचा जीव, कारमध्ये सापडली दारुची बाटली, हुक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातात ठार झालेले युवक युवती. - Divya Marathi
अपघातात ठार झालेले युवक युवती.
अहमदाबाद (गुजरात) - अहमदाबाद शहरातील अमीकुंज चौकात रविवारी पाहाटे वेगाने आलेली एक कार झाडावर जाऊन आदळली. या अपघातात कार चालकासह दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी आहेत. जखमींना व्ही.एस. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना शंका आहे, की कारमधील चौघेही एखाद्या पार्टीवरुन परतत असावे. पोलिसांना कारमध्ये एक दारुची बाटली सापडले आहे.
पोलिसांच्या माहितीनूसार या अपघातात कार चालक आकाश पटेल (19) याच्यासह इतर दोघांचे जागेवरच निधन झाले, तर दिव्या पटेल (20) या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात दीपाली पटेल (20) आणि आणि राहुल नायक (20) जखमी आहेत. राहुलच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून दीपालीला मल्टिपल फ्रॅक्चर आहे.
आईचे ऐकले असते तर वाचला असता जीव
दिव्याच्या अपघाती निधनाने तिची आई दुःखात बुडाली आहे. कारचालक आकाश दारुडा असल्याचे दिव्याच्या आईला माहित होते. याशिवायही तो इतर नशा करत होता. त्याच्यासोबत राहू नको असे दिव्याच्या आईने अनेकदा समजावले होते, पण तिने ते कधीच ऐकले नाही. दिव्याने माझे म्हणणे ऐकले असते तर आज ती जिवंत असती, असे तिच्या आईने सांगितले.
सूत्रांची माहिती आहे, की कार 100 पेक्षा जास्त वेगात होती. कार झाडावर जाऊन आदळली आणि चेंदामेंदा झाला. फायरब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी झाड कापून कारमधून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...