आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात: टोलनाक्‍यावर पाच गुंडांचा तलवारीने हल्‍ला, CCTV मध्‍ये चोरटे झाले कैद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - राजकोट जिल्‍ह्यातील उपलेटा डुमियाणी या टोल नाक्‍यावर काम करणा-या कर्मचा-यांवर 5 गुडांनी हल्‍ला केला केला आहे. या हल्‍ल्यात दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. त्‍यापैकी एक गंभीर आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद झाला. सीसीटीव्‍ही फुटेजचा आधार घेऊन पोलिस पुढील तपास करत आहेत.
अचानक झाला हल्‍ला:
या हल्‍ल्यामध्‍ये जखमी झालेले हरेशभाई वरू (20) आणि उर्वीश (24) यांना उपचारासाठी हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे. त्‍यांनी सांगितले की, शुक्रवारी पहाटे ते कॅबीनमध्‍ये होते. तलवार घेऊन आलेल्‍या पाच लोकांनी थेट त्‍यांच्‍यावर हल्‍ला करण्‍यास सुरूवात केली.
तोडफोड केल्‍यानंतर पैसे घेऊन पसार:
या आरोपींनी कॅबीनचे काच फोडले, टेबल व इतर साहित्‍याचीही तोडफोड केली. त्‍यानंतर कॅश काऊंटरमधील सर्व पैसे घेऊन हे हल्‍लेखोर पसार झाले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, तलवार घेऊन आलेल्‍या हल्‍लेखोरांनी कशी केली तोडफोड..