आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकोटः दोन तरूणींनी केला तरूणावर भर चौकात चाकू हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोटः राजकोटच्या एस्ट्रोन चौकात रविवारी रात्री दोन तरूणींनी एका तरूणावर चाकूने हल्ला केला. तर त्या तरूणींसोबत आलेल्या तीन लोकांनी त्या तरूणाला बेदम मारहाणही केली.
या युवकाचे नाव नवनीत वरू असून तो कोठारिया रोडवरिल सुखराम नगरमधील बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये कामास होता. रात्री एस्ट्रॉन चौकातून जात असताना दोन तरूणींनी त्याच्यावर चाकू हल्ला केला. तरूणींसोबत आलेल्या तीन जणांनी या नवनीतला जमीनीवर आदळून आपटून मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताट 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली, आणि त्यांनी त्वरीत नवनीतला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
नवनीत वरूने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात सांगितले आहे की, हरसिध्द पार्क येथे राहाणार्‍या अल्का नावाच्या तरूणीसोबत त्याचे मागील तीन वर्षांपासून संबंध होते. अल्काचे रमेश राठोड नावाच्या व्यक्तीशी अत्यंत जवळचे संबंध आहेत, आणि अल्का आणि रमेश दोघे मला धमकी देऊन पैशांची मागणी करत होते. अल्काने मला 45000 रुपयांची मागणी केली होती. मी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे तिने माझ्यावर हा हल्ला केला आहे.