आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारचा कुख्यात दहशतवादी गुजरात पोलिसांच्या ताब्यात, बाॅम्बस्फाेट करण्याचा हाेता उद्देश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गया (बिहार)- गुजरात पोलिसाच्या दहशतवादविरोधी पथकाने अहमदाबादच्या २००८ च्या साखळी बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी तौसिफ खान यास पडताळणीसाठी अहमदाबादला नेले आहे.  

तौसिफला बिहार एटीएस पथकाने काही महिन्यांपूर्वी पकडले होते. त्याला गया येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. पोलिस निरीक्षक एस. एल. चौधरी यांनी कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात त्याला खास विमानाने अहमदाबादला नेले.  तौसिफवर दहशतवादी कारवाया प्रकरणात अहमदाबाद व सुरत पोलिस ठाण्यात ३९ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती चौधरी यांनी पत्रकारांना दिली. गया येथील पोलिस उपअधीक्षक आलोककुमार सिंग यांनी सांगितले, तौसिफला त्याच्या दोन सहकाऱ्यांसह १४ सप्टेंबरला भगतसिंग चौकात अटक केेली होती. त्याला गुजरातचे एटीएस पथक अहमदाबादला घेऊन जात आहे. या पथकाने न्यायालयाकडून त्याचा ट्रांझिट रिमांड मिळवला होता. तौसिफ हा अभियांत्रिकी पदवीधर असून गया येथील एका शाळेत तो शिक्षक होता. त्याच्यावर मुलांमध्ये देशविरोधी भावनांना चिथावणी देत असल्याचा आरोप आहे.
बातम्या आणखी आहेत...