आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखोंचे पॅकेज धुडकावून वर्ल्ड टुरवर निघाली UK ची गुजरातन, खिशात एकही पैसा नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद (गुजरात)- पैसा कमविण्यासाठी अनेक गुजराती विदेशात जातात. कालांतराने तेथेच सेटल होतात. परत भारतात येत नाहीत. पैसाच त्यांचे आयु्ष्य झालेला असतो. पण विदेशातील एका गुजराती तरुणीने या परंपरेला छेद दिला आहे. लाखोंचे पॅकेज सोडून ती वर्ल्ड टुरवर निघाली आहे. विशेष म्हणजे यासाठी तिने एक पैसाही सोबत घेतला नाही. कुणाला लिफ्ट मागून, खायला अन्न मागून तर कुणाकडे निवारा मागून ती जगत आहे. गरीब, अनाथ मुलांना दोन वेळचे जेवण मिळावे, त्यांच्या समस्या जगासमोर याव्यात यासाठी तिने हा टुर ऑर्गनाईज केला आहे.
मासिक बजेट आहे 3 ते 6 हजार
या तरुणीचे नाव आहे रायनल पटेल. गेल्या 7 महिन्यांपासून ती वर्ल्ड टूरवर आहे. लोकांना लिफ्ट मागत ती हॉंगकॉंग येथून लंडनला जात आहे. सोशल मेसेज लोकांपर्यंत जावा हा तिचा उद्देश आहे. तिने एक ब्लॉगही तयार केला आहे. त्यावर कोणीही गरीब मुलांसाठी पैसे डोनेट करु शकतो. या डोनेशनचा वापर ती या मुलांसाठी करणार आहे. तिने केलेला प्रवास ती ब्लॉगच्या माध्यमातून लोकांसमोर मांडत आहे.
या लिंकवर क्लिक करुन वाचा रायनल पटेलचा ब्लॉग...
पुढील स्लाईडवर बघा, अशा प्रकारे ती करते प्रवास... लोकांना मागून करते जेवण... अशी राहते... अखेरच्या स्लाईडवर बघा व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...