आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फायर पान’, भैय्या इसे खा डाला, तो लाईफ झिंगालाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट (गुजरात)- या राज्यात खरंच प्रयोगशिल लोक आहेत. गुजराती नेहमीच काही तरी हटके करीत असतात. येथील एका पानवाल्याने फायर पान बाजारात आणले आहे. हे पान खाल्ले तर वेगळा स्वाद मिळतो आणि जिभेवर ठिंडक राहते असा त्याचा दावा आहे. विशेष म्हणजे जळते पान खाण्याच्या रोमांचासाठी लोक हे पान खातात. त्यामुळे पानाची प्रसिद्धी आता इतर राज्यांमध्येही पसरत आहे.
या दुकानदाराचे नाव चुन्नीलाल आहे. राजकोटच्या 150 फिट रिंग रोडवर गेल्या 40 वर्षांपासून ते पानाचे दुकान चालवतात. विशेष म्हणजे त्यांना स्वतःला पान खाण्याचा शौक आहे. अनेक प्रयोग केल्यावर त्यांनी फायर पानाचा शोध लावला आहे. यासाठी ते पानाच्या वर काही लवंग लावतात. त्यानंतर त्यांना आग लावतात. आता हे जळते पान ग्राहकाला स्वतःच्या हाताने खाऊ घालतात. जळणाऱ्या लवंग एक अनोखा स्वाद ग्राहकाला देतात. तसेच याचे आयुर्वेदिक महत्त्वही आहे, असेही ते सांगतात.
पुढील स्लाईडवर बघा, चुन्नीलाल यांचे फायर पान... कृपया हा प्रयोग घरी करुन बघू नका... दुखापत होऊ शकते....