सुरत (गुजरात)- पवित्र चाबकाचे फटके खाण्यासाठी येथील भाविक वर्षभर मोठ्या आतूरतेने वाट बघतात. येथील गोरबाई माता मंदिरात नवरात्रीनिमित्त चाबकाच्या फटक्यांचा प्रसाद दिला जातो. सातमच्या दिवशी भाविकांना चाबकाचे फटके मारले जातात. मंदिरातील पूजारी पवित्र अशा चाबकाचे फटके भाविकांना मारुन हा सोहळा पार पाडतात. त्यासाठी भाविकांची अगदी झुंबड उडते.
गुजरातमध्ये नवरात्र फार जल्लोषात साजरी केली जाते. या निमित्त ठिकठिकाणी गरबा नृत्याचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमिवर काही परंपराही आहेत. श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करणाऱ्या या परंपरा फार लोकप्रिय आहेत. याचाच एक भाग म्हणून गोरबाई माता मंदिरात भाविकांना चाबकाचे फटके मारले जातात. चाबकाचे फटके बसले, की सगळ्या समस्या दूर होतात, अशी येथील भाविकांचा श्रद्धा आहे.
पुढील स्लाईडवर बघा, मंदिराचे पूजारी भाविकांना चाबकाचे फटके मारताना...