आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: राजकोटमध्ये प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, चिठ्ठीत दिले विचित्र कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट- रेसकोर्स परिसरातील लव्ह गार्डनमध्ये प्रेमीयुगुलाने आज (शुक्रवार) सकाळी फिनाईल प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गार्डनमधील लोकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर दोघांना राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. परंतु, त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येमागची विचित्र कारणे बघून पोलिसही चक्रावले आहे.
प्रेमीयुगुलातील मुलाचे नाव विशाल आडेसरा तर मुलीचे नाव बिनता कामानी असे आहे. दोघे एकाच कंपनीत जॉबला आहेत. विशालला वडील नसून दोघा भावांमध्ये मोठा आहे. बिनताला एक बहिण आहे.
विशालने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे, की एका तरुणाकडून मी 1 लाख रुपये घेतले होते. त्याला मी 20 लाख रुपये परत केले. तरी त्याने पैशांचा तगादा लावला आहे. मी सध्या प्रचंड मानसिक दडपणाखाली आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
बिनताने लिहिले आहे, की आमच्या ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याची पत्नी माझ्यावर संशय करते. मला हे अजिबात आवडत नाही. या शिवाय मला माझ्या कुटुंबीयांना गरीबीतून वर आणायचे होते. बहिणीचे लग्न करायचे होते. पण मी तसे करु शकले नाही. त्यामुळे आत्महत्या करीत आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, विशाल आणि बिनताच्या सुसाईड नोट्स आणि रुग्णालयातील फोटो....