आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबादी chef ने तयार केली बराक ओबामांसाठी खास डिश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तीन दिवसीय भारत दौर्‍यावर येत आहेत. ओबामांचा डिनर मेनू काय असेल, हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.
ओबामा दाम्पत्याच्या सुरक्षिततेपासून त्यांच्या खाण्यापिण्याची खास व्यवस्था ठेवण्यासाठी भारतीय प्रशासन कामाला लागले आहे.
तसेच पाहिले तर भारत आणि अमेरिकेतील लंच आणि डिनरच्या मेनुमध्ये जमीन- आसमान इतका फरक आहे. मात्र, जगातील बलाढ्य राष्ट्रे म्हणून ओळखले जाणार्‍याचे अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी एका टेबलवर एकत्र बसून भोजनाचा आस्वाद घेणार आहेत. त्यामुळे मेनूतील व्यजंने देखील विशेषच असतील.

अहमदाबादमधील सुप्रसिद्ध हॉटेल 'रेडिसन ब्लू'चे शेफ सौरभ श्रीवास्तव हाय प्रोफाइल व्हिज‍िटमध्ये पाहुण्याच्या 'फूड हॅबिट्स' आधीच सांगितल्या जातात. त्यानुसार, मेनु निश्चित केले जातात. यासोबत यजमान देशातील प्रसिद्ध व्यंजनावरही लक्ष केंद्रीत केले जाते.

जर मेनुमध्ये भारतीय व्यंजनासोबत बराक ओबामांचा आवडता पदार्थ देखील सादर केला जाईल. 'वेलकम ड्रिंक' म्हणून 'रोस्टेड पायनापल पन्हे आणि ठंडाई सादर केली जाईल. स्टाटरमध्ये तंदूरी अचारी पनीर आणि तंदूरी फलधारी चाट सर्व्ह केला जाऊ शकतो. फरसाणमध्ये ढोकला आणि खांडवी देखील सादर केली जाऊ शकते. मेइन कोर्समध्ये 3 चीझ ग्रील्ड भरवा सिमाल मीर्च, रोस्टेड पालक आणि गोल्डन कॉर्न, गार्लिक नान, दाल मखनी आणि जीरा राईस सर्व्ह केला जाणार आहे. शेवटी डेझर्टमध्ये केसर पिस्ता खीर आणि रस मलाई सर्व्ह केली जाऊ शकते.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, पाहा खास व्यजंनांचे फोटो...