आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vadodara International Art & Cultural Festival VadFest 2015

पाहा, ड्रोनच्या साह्याने काढलेले बडोदा वेडफेस्ट 2015 चे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा - संस्कार नगरी असलेल्या बडोद्यामध्ये शुक्रवारी 12 हजार लोकांनी ड्रमवादन केले. यासोबतच वडफेस्ट-2015 ची सुरूवात झाली. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, यांच्यासह केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृति इराणी यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी ड्रमवर थाप मारली.

15 वर्षांनंतर भारतामध्ये ग्रीसच्या यनी यांनी केले प्रदर्शन :
पहिल्या दिवशी संध्याकाळचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे ग्रीसच्या यनी यांचे. त्यांनी रात्री उशीरा त्यांचा कार्यक्रम सादर केला. जवळपास दीड दशकांनंतर यनी भारतात कार्यक्रमासाठी आले होते. आग्रामध्ये यनी यांनी पहिला कार्यक्रम केला होता. 26 जानेवारीपर्यंत चालणार्‍या या वेडफेस्टमध्ये ए.आर.रहमान, सुनिधी चौव्हाण, कैलाश खेर तसेच सोनू निगम यांचाही सहभाग असणार आहे.
ड्रम्स ऑफ इंडियाची पुढील श्रेणी :
याप्रसंगी स्मृति इराणी म्हणाल्या की, भारतीय कला आणि संस्कृतीची भव्य पार्श्वभूमी असलेल्या या जागतीक मंचावर सादर होत असलेल्या ‘नॅशनल कल्चरल फेस्टीवल’मध्ये ‘ड्रम्स ऑफ इंडिया’ची पुढील श्रेणी ठेवण्यात येईल. पुढे त्या म्हणाल्या की, वायब्रेंट समिट देश-विदेशामध्ये व्यापाराचा केंद्रबिंदू बनत आहे, त्याचप्रकारे वेडफेस्ट हे जागतीक संस्कृतीचेही केंद्रबिंदू बनेल.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, या वेडफेस्टमधील इतर PHOTOS