आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: मदमस्त डान्सरला पाहून या पोलिस कॉन्स्टेबलचे हरपले भान!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा- गुजरातमधील बडोदा शहरातील दोन पोलिस कॉन्स्टेबलचा एक व्हिडिओ 'व्हॉट्स अॅप'वर व्हायरल झाला आहे. मदमस्त महिला डान्सरला पाहून पोलिस कॉन्स्टेबल इतके भान हरपले आणि ते अक्षरश: डान्सरसोबत थिरकताना व्हिडिओत दिसत आहेत.

पोलिस कॉन्स्टेबल सुरेश मोरे आणि आमीन पठान यांनी खाकीवर्दीच्या मर्यादेचे उल्लंघन करून एका विवाह सोहळ्यात चक्क डान्सरसोबत ठमके लावले. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

आयुक्त ई.राधाकृष्णन यांनी सांगितले की, 'व्हॉट्‍स अॅप'वर व्हायरल झालेला व्हिडिओ किती सत्य आहे, याची शहानिशा केली जाईल. डीसीपी एच.आर. मलियाणा या प्रकरणी चौकशी करत आहेत.
मिळालेली माहिती अशी की, गेल्या 10 मे रोजी एका वाहतूक पोलिस अधिकार्‍याच्या मुलाचा विवाह पार पडला. विवाह सोहळ्यात 'म्युझिकल नाइट' कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यादरम्यान, रात्री 11 वाजता दोन पोलिस कॉन्स्टेबल स्टेजवर चढले आणि डान्सर सोबत थिरकू लागले. मदमस्त डान्सरला पाहून दोघे अक्षरश: आपले भान विसरले होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, मदमस्त डान्सरसोबत थिरकताना पोलिस कॉन्स्टेबलचा व्हिडिओ आणि फोटो...
बातम्या आणखी आहेत...