बडोदा- सोशल मीडियापर आक्षेपार्ह छायाचित्रे आणि मजकूर पोस्ट केल्यानंतर गुजरातमधील बडोदा शहरात तणावपूर्ण परिस्थिती तिसर्या दिवशीही कायम आहे. दोन समुहांत शुक्रवारी उसळलेल्या दंगलीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राखीव पोलिस आणि जलद कृती दलासह स्थानिक पोलिसांचा घटनास्थळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गुजरातमध्ये नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ऐन उत्सवात ही हिंसक घटना घडली आहे
दोन समुहांच्या तरुणांच्या दुचाकीची एकमेकांना धडक झाली. त्यानंतर एका समुहाविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि मजकूर पोस्ट करण्यात आला. '
फेसबुक' आणि 'वॉट्सअॅप'वर छायाचित्रे झळकल्याने बडोदा शहरातील फतेहपुरा भागात हिंसा भडकली. संतप्त जमावाने संजय रावजी यांच्या घरावर तुफान दगडफेक केली. या दरम्यान काही तरुणांचे लहरीपूरा दरवाना परिसरात एका वकीलासोबत भांडण झाले. या घटनेनंतर जोरदार दगडफेक सुरू झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराचा वापर केला. तसेच 12 राउंड हवेत फायर करावे लागले. अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेच घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
शहरातील बवाबाजार, याकूतपुरा, हाथीखाना, लडवाडा आणि छिपवाडमध्येही अशाच प्रकारच्या घटना घडल्या. चांपनेर गेट, मांडवी गेट आणि दभी फैया भागात तीन नागरिकांवर दंगेखोरांनी हल्ला केला. त्यात तिघे जखमी झाले. फतेहुरा भागात दोन दुचाकी पेटवून देण्यात आल्या. तसेच एक मेडिकल स्टोअर्स आणि
मोबाइल शॉपीला आग लावली. यानंतर याभागात प्रचंड तनाव निर्माण झाला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिस आयुक्त राधाकृष्णन यांनी सांगितले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, बडोद्यातील तणावपूर्ण परिस्थितीची छायाचित्रे...