आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंजारा : मी फक्त आपली रेषा मोठी करतो, आता तुरुंगातील तपाचे फळ मिळत आहे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरात एटीएसचे प्रमुख राहिलेले वंजारा, त्यांच्यावर सोहराबुद्दीन, तुलसी प्रजापती, इशरत जहाँच्या बनावट एन्काउंटरचा आरोप आहे. ९ वर्षे तुरुंगात होते. जामिनावर सुटले आहेत. तुरुंगाबाहेर येताच राजकारणात जाण्याची घोषणा केली. दिव्य भास्करचे अपूर्व त्रिवेदींनी त्यांच्याशी नरेंद्र मोदी-अमित शहांशी संबंध, गुजरात दंगल, राजकीय महत्त्वाकांक्षा यावर चर्चा केली...

* तुरुंगात तुम्ही मोदी-शहांच्या विरोधात पत्र लिहिले, मग चूप झाले आणि जामिनावर बाहेर. काही डील झाली का?
- कोणतीही डील नाही. वेळ बदलली, समीकरणेही बदलली. पत्र लिहिले तेव्हा स्थिती वेगळी होती. आता नरेंद्रभाई पंतप्रधान तर अमितभाई पक्षप्रमुख आहेत. मला जामीन न्यायप्रक्रिया व पुराव्यांच्या बळावर मिळाला. बाकी योगायोग आहे.

* तुरुंगाबाहेर येताच राजकारणाबाबत बोललात. दुसरे अमित शहा बनण्याची तयारी आहे?
-मी दुसरा अमित शहा कशाला बनू? मी आधी वंजाराच बनेन. मी इतरांची रेषा कमी करण्याऐवजी आपली रेषा मोठी करण्यावर विश्वास ठेवतो.

* तुमच्याकडे मोठ्या नेत्यांचे रहस्य आहे, त्या जोरावर राजकारण कराल का?
- हे पाहा, निर्दोष असूनही मी ९ वर्षांपासून तुरुंगात होतो. ते माझे तप होते. ज्या फळासाठी मी काम केले, सजा भोगली. आता फळ मिळाले आहे, ते जनतेसोबत वाटण्याची इच्छा आहे.

* म्हणजे तुम्ही निवडणूक लढणार?
-निवडणूक तर लढणारच. कुठून हे निश्चित नाही. मी गुजरातचा दौरा करत आहे. मी विकासाचे पंचामृत घेऊन फिरत आहे. तिकिटाबाबत तर काळच काही सांगू शकेल.

* विकासाचे पंचामृत! म्हणजे?
-गुजरातला मी ५ गोष्टी देऊ इच्छितो. सामाजिक एकता-सद््भावना. राजकीय स्थैर्य, लोकसहभाग, आर्थिक विकास व न्याय.

* मोदींना कोणी चांगले ओळखत असेल तर शहा किंवा वंजारा, असे म्हणतात. खरे आहे?
-हे तर माहीत नाही, पण तुम्ही मोदींचा किती आदर करता असे मला विचारले होते. तेव्हा मी म्हटले होते की खूप आदर करतो, पण अमित शहा यांचा अनादरही करत नाही.

(फोटो : सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पिस्तुलाची माळ घालताना वंजारा.)
बातम्या आणखी आहेत...