अहमदाबाद - नरेंद्र मोदींची सभा किंवा कार्यक्रम असला की अफाट गर्दी होते, हा कदाचित भाजपचा दावा असू शकतो. मात्र, शुक्रवारी आपल्या राज्यात गुजरातमध्ये मोदींना वेगळाच अनुभव आला. मुस्लिम उद्योजकांच्या परिषदेत मोदी पोहोचले तेव्हा व्यासपीठासमोर असलेल्या खुर्च्या रिकाम्या होत्या. जे लोक बसलेले होते त्यात बहुतांश पत्रकार, स्वयंसेवक आणि परिषदेतील स्टॉलधारक होते. याबाबत आयोजकांपैकी एक सरेश जफरवाला यांनी सांगितले की, मोदींच्या कार्यक्रमासाठी मोजक्या लोकांनाच बोलावण्यात आले होते.
उपाशीपोटी देव-देव होत नाही... : हिंदू आणि मुस्लिम विकासाची दोन चाके असल्याचे सांगून ही चाके एकत्र जोडावी लागतील, असे आवाहन मोदींनी केले.
मोदींनी
सलमान खानसोबत पतंग उडवले, नंतर कोलकात्यात हज यात्रेसाठी सबसिडीचा मुद्दा लावून धरला. शुक्रवारी मुस्लिम परिषदेत हजेरी लावली. ‘बिझनेस विथ हार्मनी’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. मुस्लिम समाजाची त्यांनी तोंड भरून स्तुती केली.
राहुलही रांचीत : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी रांचीमध्ये अल्पसंख्यांकांच्या भेटीसाठी दाखल झाले. राजकारणात अल्पसंख्याकांसाठी संधीची दारे उघडावी लागतील, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.