अहमदाबाद - येथील कांकडिया कर्निव्हलमध्ये डिसेंबर महिन्यात झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात एका पोलिस कर्मचाऱ्याने एक नव्हे तर अनेक महिलांची छेड काढली. याचा व्हिडिओ सध्या व्हायलर झाला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन चौकशीचे आदेश दिले.
नेमके काय आहे व्हिडिओमध्ये ?
- हा व्हिडिओ एका मिनिटांचा आहे.
- यामध्ये एक पोलिस कर्मचारी कार्निव्हलमध्ये आलेल्या महिलांना नको तिथे स्पर्श करताना दिसत आहे.
- व्हिडिओमध्ये तो केवळ पाठमोरा दिसत असून, त्याचा चेहरा दिसत नाही.
- या प्रकरणी माणिनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन.एस. देसाई म्हणाले, आम्ही चौकशी सुरू केली आहे. या ठिकाणी अनेक पोलिस कर्मचारी ड्यूटीवर होते. त्यापैकी तो नेमका कोण आहे, याचा शोध घेत आहोत.
काय आहे कांकडिया कार्निव्हल?
- हा उत्सव दरवर्षी वर्षाच्या शेवटी आयोजित केला जातो. तो एक आठवडा चालतो.
- कार्निव्हल कल्चरलमध्ये, कला आणि अनेक सामाजिक कार्यक्रम होतात. यात अनेक जण भाग घेतात.
- या ठिकाणी महिलासुद्धा असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला जातो.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या खळबळजनक घटनेचा व्हिडिओ आणि फोटो....