आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पटेल यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ जारी; हार्दिक म्हणाले, तो तरुण मी नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- गुजरात निवडणुकीच्या तोंडावर पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल एका वादग्रस्त व्हिडिओमध्ये सापडले आहेत. यू ट्यूबवर अपलोड झालेल्या या व्हिडिओमध्ये हार्दिकसारखी दिसणारी व्यक्ती एका महिलेसाेबत हॉटेलच्या खोलीत थांबलेली आहे. महिलेची फक्त पाठ दिसते आहे. काही वेळानंतर खोलीमध्ये अंधार होतो. मात्र, या व्हिडिओमध्ये हार्दिक पटेल आहेत, याची पुष्टी झालेली नाही. वाद चिघळल्यानंतर हार्दिक यांनी सांगितले, व्हिडिओ काटछाट करून तयार करण्यात आला आहे.  

यामध्ये दिसणारी व्यक्ती मी नाही. भाजपच्या मूळ स्वभावानुसार त्यांनी गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. हार्दिक पटेल यांनी सांगितले, भाजप कोट्यवधी रुपये खर्चून मॉर्फिंगने कोणाचाही असा व्हिडिओ तयार करू शकतो. अाणखी वादग्रस्त व्हिडिओ येण्याची शक्यता आहे. तीन-तीन महिलांसाेबत असे व्हिडिओ असू शकतात. आमच्या अन्य पदाधिकाऱ्यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न होईल. परंतु अशा तंत्राने आम्ही दबणार नाही. हार्दिक पटेल यांंची संघटना ज्या दिवशी काँग्रेसने दिलेल्या फॉर्म्युल्यावर आपला निर्णय जाहीर करणार होती, त्याच दिवशी हा व्हिडिओ आलेला आहे, हे उल्लेखनीय. हार्दिक पटेल यांनी सप्टेंबर महिन्यातच आपल्या बदनामीसाठी काही अश्लील व्हिडिओ जारी होण्याची शक्यता वर्तवली हाेती.
  
तर हार्दिक पटेल यांनी सांगितले, अश्विन भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याचे केंद्रीय मंत्र्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. अश्विनने १५ दिवसांपूर्वी भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला आहे. 
 
पाटीदार नेत्याचे आव्हान 
हार्दिक पटेल यांनी ९६ तासांत व्हिडिओ खोटा असल्याचे सिद्ध करावे; अन्यथा आणखी काही पुरावे जाहीर करू  हार्दिक पटेल यांचा माजी सहकारी अश्विन सांकलशेरिया याने आव्हान दिले की, हार्दिकने ९६ तासांत व्हिडिओ खोटा असल्याचे सिद्ध करावे; अन्यथा त्याचे आणखी अनेक कारनामे आम्ही जनतेसमोर ठेवणार आहोत. त्यांनी म्हटले, हार्दिक पटेल याआधीही एका मुलीसोबत मनाली येथे गेले होते. सध्याच्या व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी दुसरी आहे. अश्विन म्हणाला, त्याच्याकडे हार्दिकच्या संघटनेतील मोरबी, राजकोट व सुरतमधील संयोजकांच्या विरोधात पुरावे आहेत. 
 
 
काय म्हणाला हार्दिक पटेल.. 
- मीदेखिल हा व्हिडिओ पाहिला आहे. एखादा माणूस मोठा होत असेल तर अशा प्रकारचे प्रयत्न होतच असतात. 
- या लोकांनी राजकारणाची पातळी ओलांडली आहे. हेरगिरीची कामे करणारे हे लोक आहेत. 
- वेब पोर्टरवर याधीच अशी स्टोरी येऊन गेली आहे. 
- गुजरातच्या महिला आणि भगिनींना माझ्यावर विश्वास आहे. 
- सत्तेच्या लालसेपोटी महिलांचा वापर केला जात आहे. 
- आता महिलांना धमकावल्याची प्रकरणेही समोर येतील. 
- मला याने फरक पडत नाही, मी समाजाच्या कामासाठी बाहेर पडलो आहे. 
- विजय रुपाणी यांनी अहमद पटेलांवर आरोप केले, त्याचे पुढे काही झाले नाही तर आता हार्दिक पटेलच्या मागे लागले. 
- आम्ही निधड्या छातीने भाजपच्या विरोधात लढत राहणार आहोत. 
- ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ दिला त्याने भाजप जॉइन केले आहे. 
- मी आधीच म्हटले होते की, व्हिडिओ समोर येणार आहे. 
- घाणेरड्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. 
- भाजपला व्हिडिओच्या मदतीने 150 तर नाही पण 50 जागा वाचवता येतील.
- मी जर चुकीचा नसेल तर लोक माझ्या सभांना नक्की येतील. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हिडिओतील स्क्रीनशॉट.. अखेरच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ.. 
बातम्या आणखी आहेत...