आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विजय रूपानींना शपथ; मंत्रिमंडळातील ९ मंत्र्यांना वगळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर- भाजपचे नेते विजय रूपानी यांनी रविवारी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची तर नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या दोघांशिवाय सात कॅबिनेट मंत्री आणि १६ राज्यमंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. रूपानी यांच्या मंत्रिमंडळात एकूण २५ मंत्री असतील. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्र्यांना मात्र या वेळी वगळण्यात आले.

राज्यपाल ओ. पी. कोहली यांनी रूपानी आणि पटेल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी समारंभाला भाजपचे अध्यक्ष अमित शहा, पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि हर्षवर्धन तसेच महाराष्ट्र, झारखंड व हरियाणाचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

यांना वगळले :
आनंदीबेन मंत्रिमंडळातील अर्थमंत्री सौरभ पटेल, वन आणि पर्यावरणमंत्री मंगूभाई पटेल तसेच सामाजिक न्याय आणि सबलीकरणमंत्री रमणलाल व्होरा, रजनीभाई पटेल, वसूबेन त्रिवेदी, छत्रसिंह मोरी, गोविंद पटेल, ताराचंद छेडा आणि कांतिभाई गामित यांना वगळण्यात आले आहे.

नवीन कॅबिनेट मंत्री असे
नितीन पटेल, भूपेंद्र चुडासामा, गणपत वसावा, बाबू बोखिरिया, दिलीप ठाकोर, जयेश रडादिया, चिमण सपरैया आणि आत्माराम परमार. चुडासामा आणि बोखिरिया हे आनंदीबेन मंत्रिमंडळातही कॅबिनेट मंत्री होते. ठाकोर आणि रडादिया यांना राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...