आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे \'विकास पागल हो गया है\' स्लोगनची स्टोरी, या तरुणाची आहे क्रिएटिव्हिटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रसिद्ध झालेल्या "विकास पागल हो गया है" स्लोगनवर सर्वात जास्त चर्चा झाली. या स्लोगनला काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान वापरले. तथापि, या स्लोगनच्या उत्तरात जेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मैं विकास हूँ" तेव्हा काँग्रेसने याचा वापर करणे बंद केले. वास्तविक, ही स्लोगन बनवणारा अहमदाबादचा 20 वर्षांचा एक तरुण आहे.

 

हार्दिक पटेलच्या जवळचा आहे हा तरुण
- "विकास पागल हो गया है" हे स्लोगन देणाऱ्या तरुणाचे नाव सागर सावलिया बेफाम आहे. सागर हा हार्दिक पटेलच्या जवळचा आहे, तसेच तो पाटीदार आंदोलनाशीही जोडलेला आहे. सागर इंडुस युनिव्हर्सिटीच्या सिव्हील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. याआधी त्याने व्हीपीएमपी पॉलिटेक्निक मधून शिक्षण घेतले आहे. सध्या, तो बेफाम न्यूज नावाने एक वेबसाइट चालवतो. एका इंटरव्ह्यूमध्ये सागरने सांगितले की, जेव्हा मी हा स्लोगन बनवला होता, तेव्हा मला विश्वास नव्हता की एवढा पॉप्युलर होईल.

 

काय आहे या स्लोगनच्या मागची स्टोरी
- सागरने इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, एका दिवशी त्यांनी फेसबुकवर एक फोटोही टाकला. फोटोत एक सरकारी बस दिसत होती, जिचे टायर फुटलेले दिसले. या फोटोच्या खाली त्यांनी गुजरातीमध्ये कॅप्शन लिहिले- "सरकारी बसेस आमच्या आहेत, परंतु यात चढल्यानतर तुमच्या सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे. जेथे असाल तेथेच राहा विकास पागल झाला आहे." यानंतरच हे स्लोगन व्हायरल झाले. लोक ही लाइन घेऊन नवनवे स्लोगन बनवायला लागले आणि कॉमेंट्स करायला लागले.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...