आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Villagers Of Gujarat Build Narendra Modi Temple In Rajkot News In Marathi

पंतप्रधानांच्या नाराजीनंतर आता गुजरातमध्ये नरेंद्र मोदींऐवजी उभारणार भारतमातेचे मंदिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट- गुजरातच्या राजकोटमधील काठुरिया मंदिर उभारल्याच्या मुद्यावरून मोदींनी ्यक्त केलेल्या नाराजीनंतर, या ठिकाणी मोदींचे मंदिर उभारण्याचा निर्णय रद्द करण्यात आला असून आता त्याऐवजी भारतमातेचे मंदिर उभारले जाणार आहे.
मंदिराचे काम पूर्ण झाले असून 15 फेब्रुवारीला राज्याचे कृषीमंत्री मोहन कुंदरिया यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्‍यात येणार होते. मोदींनी याबाबत 'ट्विटर'वरुन नाराजी व्यक्त केली होती. 'आपले मंदिर उभारल्याचे वृत्त पाहून प्रचंड धक्का बसला', असे मोदींनी ट्‍वीट केले आहे. आपले मंद‍िर उभारु नये, असे आवाहनही मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.

दरम्यान, कोठारियाचे सरपंच मंसुख कुमार यांन सांगितले की, दररोज 100 भाविक नरेंद्र मोदींचे दर्शन करतील. यापूर्वी गावातील भाजप समर्थक नरेंद्र मोदींच्या एका मोठ्या प्रतिमेसमोर बसून प्रार्थना करत होते. आता या समर्थकांनी नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारले आहे. मंदिरात नरेंद्र मोदी यांची मूर्ती असेल. ही मूर्ती तयार करण्यासाठी ओडिशातून मूर्तीकार आले आहे.

या मंदिरावर जवळपास पाच लाख आणि मूर्तीवर दोन लाख रुपये खर्च झाले आहेत. देव- देवतांच्या मूर्तीप्रमाणे मोदींच्या मूर्तीचीही प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. मंदिरात दररोज आरतीसोबत 'नमो-नमो'चा जप केला जाणार आहे. भाजप समर्थकांनी मंदिराच्या कळसावर भाजपचा झेंडा लावला आहे.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ने भाजपचा विजयरथ रोखला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर कोणताही परिणाम झालेला नाही.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, नरेंद्र मोदींच्या मंदिराचा व्हिडिओ आणि फोटो...