महेसाणा- गुजरातमध्ये पाटीदार समाजबांधवांनी आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाने पुन्हा एकदा हिंसक रूप धारण केले आहे. रविवारी ‘जेल भरो आंदोलन’ करताना पाटीदार समाजाचे हजारो लोक महेसाणामध्ये एकत्र आले. आंदोलक आणि पोलिस समोरा-समोर आले. आंदोलकांनी दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला. यामध्ये सरदार पटेल ग्रुपचे (एसपीजी) अध्यक्ष लालजी पटेल जखमी झाले. हार्दिक पटेलला तुरुंगातून बाहेर काढा अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.
महेसाणामध्ये संचारबंदी, मोबाइल-इंटरनेट बंद...
- लालजी पटेल जखमी झाल्यानंतर महेसाणामध्ये हिंसक वातावरण पेटले.
- पाहता पाहता शहरातील बाजारपेठा बंद झाल्या, तणाव वाढत गेला.
- हार्दिकनंतर लालजी पटेल या आंदोलनाचे नेतृत्व करत होते.
- तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी आजुबाजुच्या परिसरातून पोलिसांना बोलावण्यात आले.
- शहरात संचारबंदी लागू केल्यानंतर मोबाइल-इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली.
- या आंदोलनाचा प्रमुख हार्दिक विरोधात राजद्रोहाचा खटला सुरू आहे.
- मागील आठ महिन्यांपासून हार्दिक तुरुंगात आहे.
मंत्र्याच्या कार्यालयावर हल्ला....
- महेसाणामध्ये गुजरातचे मंत्री नितिन पटेल यांच्या कार्यालयावरही हल्ला झाला आहे.
- गुजरात सरकारचे प्रवक्ते नितिन पटेल यांनी पाटीदारांना शांततेसाठी आवाहन केले.
गुजरातेत सवर्णांनाही ५ ते ७ % आरक्षणाची सरकारची तयारी
गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत सरकारने केवळ पाटीदारांनाच नव्हे तर बिगर आरक्षित वर्गात येणाऱ्या घटकांना आर्थिक अाधारावर आरक्षण देण्याचा मसुदा तयार केला आहे. या निर्णयानुसार सवर्णांना ५ ते ७ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. रविवारच्या पाटीदारांच्या जेलभरो आंदोलनानंतर सरकार याची अधिकृत घोषणा करू शकते. या आरक्षणाचा मसुदा तयार करताना सध्याच्या जातीवर आधारित ४९ टक्के आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, आंदोलनाचे फोटो....