आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात सरकारची एक वेबसाईट हॅक, झळकले पाकिस्तान झिंदाबादचे वॉलपेपर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेबसाईट उघडल्यावर त्यावर पाकिस्तानचा झेंडा दिसत होता. - Divya Marathi
वेबसाईट उघडल्यावर त्यावर पाकिस्तानचा झेंडा दिसत होता.
सूरत- गुजरातमधील सूरत जिल्हा शिक्षण कार्यालयाची (डीईओ) वेबसाईट हॅकर्सने हॅक केली होती. या साईटवर गेल्यास पाकिस्तानचा झेंडा झळकायचा. त्यावर ‘हॅक्ड बाय सायबर हंटर’, ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘जस्ट अ सिक्युरिटी वॉर्निंग :)’ अशी वाक्य झळकायची. याची माहिती मिळताच सायबर एक्सपर्टकडून ही साईट पुन्हा रिस्टोर करण्यात आली आहे. 
 
सायबर हल्ल्यांचा धोका
दहशतवादी संघटना, पाकिस्तान आणि चीन सारख्या देशांकडून सायबर हल्ल्याचा धोका आहे. गुजरात सरकारची एक साईटच हॅकर्सनं हॅक केली होती. सायबर हल्ल्यांचा धोका कायम असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.