आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wedding Sari Of Indira Gandhi Was Made By Jawaharlal Nehru

PHOTOS: नेहरूंनी बनवलेली सूती साडी इंदिरांनी लग्‍नात केली होती परिधान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इलाहाबाद - देशाच्‍या पहिल्‍या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे जीवन विविध बाबींसदर्भात काहीसे वादग्रस्‍त ठरले. त्‍यांच्‍या फिरोज गांधींसोबतच्‍या विवाहाचीही देशभर उलटसुलट चर्चा होती. पण महात्‍मा गांधी यांनी समजून घातल्‍यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी लग्‍नासाठी परवानगी दिली. इंदिरा गांधी यांनी लग्‍नाच्‍या दिवशी वडिलांनी स्‍वत: सूत कताई करून तयार केलेली साडी परिधान केली होती. आज 19 नोव्‍हेंबर इंदिरा गांधी यांचा जन्‍मदिवस त्‍यानिमित्‍ताने जाणुन घेऊया इंदिरा यांच्‍या लग्‍नातील काही प्रसंग.
लेखिका कृष्णा हठीसिंह यांनी इंदिरा गांधी यांच्‍यावर जीवनावर आधारित 'इंदिरा ते पंतप्रधान' हे पुस्‍तक लिहीले आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी विविध प्रसंग मांडले आहेत. 26 मार्च 1942 रोजी इंदिरा गांधी यांचे लग्‍न झाले होते. कृष्‍णा हठीसिंह यांनी या पुस्‍तकात लिहीले की, जवाहरलाल नेहरू यांनी फिरोज यांना कधी जावाई मानले नाही. लग्‍नसोहळ्यातही ही बाब दिसून आली होती. लेखिकेने लिहीले की, 'मार्च महिन्‍यातील तो लग्‍नाचा दिवस खुप चैतन्‍यमय होता. तीव्र उन्‍ह होते. इंदिराने केसरी रंगाची साडी परिधान केली होती. त्‍या साडीत चांदीचे छोटे छोटे फुलं लावण्‍यात आले होते. या साडीचे सूत इंदिरा यांच्‍या वडिलांनी कातले होते. इंदिरा तेव्‍हा नेहमीप्रमाणे शांत आणि गंभीर होत्‍या.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, इंदिरा यांच्‍या लग्‍नसोहळ्याचे फोटो..