अहमदाबाद- गुजरातमध्ये शनिवारी आणि रविवारी गरबा-दांडियाचा उत्साही जल्लोष दिसून आला. नवरात्रीत येणारा हा पहिला आणि शेवटचा विकेंड असल्याने तरुणाईने बहारदार नृत्य सादर केले. ज्यांना नोकरी किंवा धंद्यामुळे इतर दिवसांमध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही अशा उत्साही तरुणांनी शनिवारी आणि रविवारी आपली उपस्थिती नोंदविली. या दिवशी आयोजकांनीही विशेष कार्यक्रम सादर केले. सेलिब्रिटी गायक आणि कलाकार बोलविण्यात आले होते. काही भागांमध्ये या विकेंडला रात्री उशिरापर्यत गाणी वाजविण्याला परवानगी देण्यात आली होती.
पुढील स्लाईडवर बघा, या विकेंडला गुजरातमध्ये कसा रंगला गरबा दांडिया... बघा देखण्या तरुणींनी उपस्थितांना कसे लावले वेड...