आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात झिका व्हायरस : गुजरातेत 3 रुग्ण, आरोग्य प्रशासन सतर्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- देशात प्रथमच झिका हा विषाणू सापडला आहे. अहमदाबादेत या विषाणूची बाधा झालेली तीन प्रकरणे समोर आली असून डासांच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार होतो. फेब्रुवारी २०१६ मध्ये या विषाणूला अटकाव करण्यासाठी विमानतळांवरच आरोग्य विभागाने यंत्रणा लावली होती. नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ या काळात एका सर्वेक्षणात तीन प्रकरणे सापडली होती.

लक्षणे: विषाणुबाधाझालेल्या व्यक्तीला ताप येतो, डोळे लाल होतात, सांधे आणि मांसपेशीत वेदना जाणवतात. आतापर्यंत विमानतळांवर खास यंत्रणा ठेवल्यानंतर देशात कुठेही या विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळले नव्हते. मात्र, आता अचानक एका वृद्ध व्यक्तीसह दोन गर्भवतींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
 
आरोग्य प्रशासन सतर्क
- गांधीनगर येथील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ (IIPH)चे प्राध्यापक दीपक सक्सेना यांनी सांगितल्याप्रमाणे,  'आता आपल्याला अधिक सतर्क व्हावे लागणार आहे. झिका आणि डेंग्यू व्हायरस एकसारखेच आहेत. झिकाचा फैलाव सुद्धा झपाट्यानेच होतो.'
- 'गर्भवती महिलांसाठी हा आजार अतिशय भयंकर आहे. यामुळे, पोटातील अर्भकाला जन्मभरासाठी व्याधी होऊ शकते. पोटातील मुलाच्या मेंदूच्या आकाराचा विकास होत नाही. त्यामुळे, आयुष्यभर डोक्याचे आकार सुद्धा सर्व बाजूंनी दबलेले किंवा इतरांपेक्षा वेगळे होते. अशा प्रकारची मुले इतरांच्या तुलनेत स्पर्धेमध्ये मागे राहतात.'
बातम्या आणखी आहेत...