आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INSIDE STORY : अहमद पटेल यांच्या इशाऱ्यांवर राज्यसभा निवडणुकीत बोगस व्होटिंग?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि सचिव अहमद पटेल यांनी गुजरातच्या राजकारणात आपणच चाणक्य असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. काँग्रेसच्या पैकी 14 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सुद्धा ते सलग पाचव्यांदा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. पटेल यांना 44 आणि भाजपच्या बलवंत सिंह यांना केवळ 38 मते मिळाली. सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे, भोला भाई गोहिल आणि राघवजी भाई पटेल यांची मते अवैध ठरवण्याचे पटेल यांनी आधीच ठरवले होते. दोघांनी भाजपला मत देण्यापूर्वी शक्तिसिंह गोहिल यांना बॅलेट पेपर दाखवणे आणि काही सेकंदात पेपर अमित शहा यांना दाखवणे हा योगायोग मानला जात नाही. भाजपला जाळ्यात अडकवण्यासाठी ही अहमद पटेल यांचीच खेळी होती असे सुत्रांकडून समजते. 
 
 
- गुजरातच्या एकूण 176 आमदारांनी मतदान केले. यापैकी अमित शहा आणि स्मृती ईराणी यांना प्रत्येकी 46-46 मते मिळाली. अहमद पटेल यांना 44 आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार बलवंत सिंह यांच्या पदरात 38 मते पडली. दोन मते रद्दबातल ठरवण्यात आली आहेत. 
- अहमद पटेल यांच्या विजयाचा गुजरातच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे. विरोधात वातावरणात असतानाही काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. याच वर्षाच्या शेवटी गुजरात विधानसभा निवडणूक होणार आहेत. अशात पटेल काँग्रेसकडून सीएम पदाचे दावेदार म्हणून पुढे येऊ शकतात. 
- विशेष म्हणजे, 1977 च्या आणीबाणी काळात काँग्रेस विरोधी लाट असतानाही पटेल खासदार झाले होते. यावेळी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही त्यांनी राज्यसभेची जागा काबिज करून आपल्या विरोधकांना धक्का दिला.
 

वारंवार शहांवर लावले आरोप
- अहमद पटेल यांनी वारंवार शहा यांच्यावर आपल्याला पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आरोप लावले. शहा आणि पटेल यांची प्रतिष्ठा या निवडणुकीनिमित्त पणाला लागली होती. 
- मंगळवारी मध्यरात्रीनंतर उशीरा 1.40 वाजता काउन्टिंग सुरू झाली. 8 आमदारांच्या क्रॉस व्होटिंगने घाबरलेले काँग्रेस नेते रिस्क घेण्यास तयार नव्हते. मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता मोजणी सुरू होताच दोन बंडखोरांचे मत बाद ठरवण्याची मागणी उठली. काँग्रेसने यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. भाजपचा ताफाही आयोगाकडे पोहोचला.
 

4 तासांत 3-3 वेळा आयोगाकडे पोहोचले नेते
-  4 तासांत काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी तीन-तीन वेळा निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यात भाजपच्या 6 केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश होता. रात्री चक्क 11.40 वाजता 2 मते बाद ठरवून मतमोजणी सुरू झाली. 8 तासांनंतर मोजणी सुरू होणार होती. मात्र, भाजपने आत्ताच मोजणी सुरू करण्याची मागणी लावून धरली. तीनपैकी दोन जागांवर अमित शहा आणि स्मृती ईराणी यांचा विजय झाला.
 
 
काय आहे नियम?
- राज्यसभा निवडणुकीत मतदान करताना मतदाराला बॅलेट पेपर पक्षाच्या अधिकृत पोलिंग एजंटला दाखवावे लागते. यानंतर बॅलेट बॉक्समध्ये ते टाकावे लागते. 
 
 
झाले असे...
- राघवजी पटेल आणि भोलाभाई गोहिल यांनी 2 सेकंदांसाठी बॅलेट पेपर अमित शहा यांच्याकडे दाखवला. काँग्रेसचे पोलिंग एजंट शक्तिसिंह यांनी ते पाहिले. यानंतर काँग्रेसने मते बाद करण्याची मागणी उचलली. मते बाद झाल्यानंतरच लागलेल्या निकालात अहमद पटेल यांना विजयी घोषित करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...