आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Hardik Patel Is Distributing Lollipops In Gujarat Towns And Villages

हार्दिक पटलचे नवे आंदोलन, गुजरातमध्‍ये गावोगावी वाटणार लॉलीपॉप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातमधील पाटीदार पटेल समाजाचे आरक्षण आंदोलन दडपून टाकण्‍यासाठी शासनाने आर्थिकदृष्‍ट्या मागास असलेल्‍या विद्यार्थ्‍यांसाठी एक कोटी रुपयांच्‍या पॅकेजची घोषणा केली. मात्र, यामुळे पाटीदार पटेल समाजाचा विकास होणार नसल्‍याचे मत युवा नेता हार्दिक पटेल याने व्‍यक्‍त केले. शिवाय याला विरोध म्‍हणून गावोगावी 'लॉलीपॉप'चे वितरण करणार असल्‍याच्‍याही घोषणाही त्‍यांनी केली.
काय म्‍हटले हार्दिकने
सरकारचे हे पॅकेज म्‍हणजे लॉलीपॉप आहे. त्‍यामुळे पाटीदार आरक्षण समिती या पॅकेजचा विरोध म्‍हणून राज्‍यभर लॉलीपॉप वाटणार आहे. विशेष म्‍हणजे हार्दिकने गुजरात उच्‍च न्‍यायालयात प्रतिज्ञापत्र दिले होते की, 28 सप्‍टेंबरपर्यंत कोणत्‍याच प्रकारचे आंदोलन, विरोध करणार नाही.
काय म्‍हटले न्‍यायालयाने ?
हार्दिकच्‍या वकिलांनी कोर्टात म्‍हटले की, ताब्‍यात घेण्‍याच्‍या बहाण्‍याने पोलिसांनी हार्दिकचे अपहरण केले. मात्र, असे म्‍हणणे हे प्रसिद्धीसाठी असल्‍याचे न्‍यायालयाने म्‍हटले. दरम्‍यान, या बाबत हार्दिकने पत्रकार परिषदसुद्धा घेतली होती.
काय आहे सरकारचे पॅकेज?
गुजरातच्‍या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी विशेष योजना पॅकेजची घोषणा केली. आर्थिकदृष्‍ट्या मागास असलेल्‍या विद्यार्थ्‍यांचे शुल्‍क माफ करण्‍याची त्‍यात तरतूद आहे. ज्‍या कुटुंबाचे वार्षिक उत्‍त्‍पन्‍न 4.5 लाखांपेक्षा कमी आहे त्‍या कुटुंबातील विद्यार्थीसुद्धा यासाठी पात्र ठरतील.