आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RJ पती रात्रभर घराबाहेर, पत्नी गेली RJ मैत्रिणीच्या दारी, आतून बाहेर आला पती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमच्यात तसले काही नाही असे असे आरजे समीनाने सांगितले आहे. - Divya Marathi
आमच्यात तसले काही नाही असे असे आरजे समीनाने सांगितले आहे.
अहमदाबाद (गुजरात)- एका रात्री पती घरी आला नाही. त्याचा फोनही लागत नव्हता. पत्नीला चिंता वाटली. तिचा संशय त्याच्यासोबत काम करणाऱ्या आरजे तरुणीवर होता. सकाळ होताच पत्नी या आरजे तरुणीच्या घरी गेली. तिने दार ठोठावले. तर घरातून आरजे पती बाहेर आला. हे बघून पत्नीला धक्काच बसला. त्यानंतर पत्नी आणि आरजे गर्लफ्रेंडमध्ये कडाक्याचे भांडण झाले. अगदी मारहाण करण्यापर्यंत वाद झाला. या पती आणि पत्नीला दोन मुली आहेत.
पत्नीने असा घातला गोंधळ
- शेरोन असे पत्नीचे तर समीर पतीचे नाव आहे. समीर आरजे असून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या समीनासोबत त्याचे प्रेमसंबंध होते.
- प्रेमसंबंधांबाबत शेरोनला संशय होतो. मेमनगरमध्ये समीर आणि शेरोन राहतात. दोघांना दोन मुली आहेत.
- रात्री 8 वाजता सिगारेट ओढून येतो, असे सांगून समीर गायब झाला होता. तो रात्रभर घरी आला नाही.
- शेरोनला संशय आला. समीर समीनाच्या घरी असावा असे तिला वाटले.
- सकाळळी शेरोन समीनाच्या घरी गेली. दार ठोठावले. तर आतून समीर बाहेर आला.
- त्यानंतर शेरोन आणि समीनामध्ये कडाक्याचे भांडण झाले. पोलिसांना बोलवण्यात आले. शेरोनने समीनाविरुद्ध पोलिस तक्रार दिली आहे.
- पण समीनाने मी निर्दोष असल्याचे सांगितले आहे. मला उगाच फसवले जात असल्याचे ती म्हणते.
2005 मध्ये केले होते लव्ह मॅरेज
- शेरोन येथील एका शाळेत नोकरी करते. 2005 मध्ये समीर आणि शेरोन यांनी लव्ह मॅरेज केले होते. दोघांना एक 8 वर्षांची तर दुसरी 18 महिन्यांची अशा दोन मुली आहेत.
- गेल्या काही दिवसांपासून समीरचे वागणे-बोलणे बदलले होते. तो वारंवार भांडण करायचा, असे शेरोनने सांगितले आहे.
तो माझ्या घरी होता...पण तसे काही नाही
- समीना म्हणाली, की आमच्या प्रेमसंबंध वैगरे काही नाही. काल त्याला नोकरीवरुन काढले. आम्ही ऑफिसचे सहकारी रात्री माझ्या घरी जमलो.
- रात्री उशीरा सगळे घरी गेले. हाही घरी गेला होता. पण जरा वेळात परतला. बायको दार उघडत नाही असे त्याने सांगितले.
- मीही त्याला माझ्याच घरी आराम असे सांगितले.
- सकाळी त्याची पत्नी माझ्या घरी आली. तिने चांगलाच तमाशा केला.
पुढील स्लाईडवर बघा तिघांचे फोटो.... समीनाचे स्टायलिश फोटो....
बातम्या आणखी आहेत...