आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wife And Her Lover Allegedly Killed Husband Over Extramarital Relations

पत्नीने प्रेमिला दिली पतीच्या हत्येची सुपारी, टीव्ही मालिका बघून रचला कट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- मेहुल आणि कृष्णाचा लग्नातील फोटो.)
वलसाड (गुजरात)- डुंगरी येथील मेहुल पटेलच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य सुत्रधार आणि लष्कराचा जवान जिग्नेश ऊर्फ रवी पटेल आणि मेहुलच्या दुरच्या मेहुण्याची चौकशी केली. याशिवाय आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावरही खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका वाहिनीवर प्रसारित होत असलेल्या 'सावधान इंडिया' या कार्यक्रमाचा एक भाग बघून कट रचल्याचे या चौघांनी सांगितले आहे.
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले, की वलसाड येथील डुंगरी परिसरातील वृंदावन सोसायटीत राहत असलेल्या मेहुल पटेलचे लग्न एका वर्षापूर्वी करदिवा गावातील कृष्णा पटेल हिच्यासोबत झाले होते. दोघांचा चांगला संसार सुरु होता. पण कृष्णा हिचे लग्नापूर्वी तिच्या गावातील जिग्नेशवर प्रेम होते. काही कारणांमुळे दोघांचे लग्न होऊ शकले नव्हते. तिच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने तिचे लग्न मेहुलसोबत लावून दिले होते.
लग्नानंतरही जिग्नेश आणि कृष्णा यांच्यात फोनद्वारे संवाद सुरु होता. याची माहिती काही दिवसांनी मेहुलला मिळाली. यासंदर्भात त्याने पत्नीला जाब विचारला होता. जिग्नेशला फोन करुन पत्नीसोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्याची धमकी दिली. यामुळे चिडलेल्या कृष्णाने जिग्नेशला नवऱ्याच्या खुनाची सुपारी दिली. त्यानंतर जिग्नेशने कृष्णाचा चुलत भाऊ सागरला खुनाची सुपारी दिली. यासाठी सव्वा लाख रुपये देण्याचे कबुल केले. प्रितम आणि चिराग या मित्रांच्या मदतीने सागरने मेहुलचा खून केला. याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, घटनास्थळाचे फोटो... मेहुलचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिस पंचनामा करताना...