आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकरासाठी पतीची हत्या करुन पुरले, तीन दिवसांनंतर मृतदेह काढून केले 100 तुकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी विहिरीतून काढलेले मृतदेहाचे तुकडे - Divya Marathi
पोलिसांनी विहिरीतून काढलेले मृतदेहाचे तुकडे
डीसा (गुजरात) - येथे एका विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे शंभर तुकडे केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. महिलेवर आरोप आहे, की तिने प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केले आहे. महिलेने पतीचा मृतदेह घराजवळ पुरला होता. तीन दिवसानंतर पुन्हा मृतदेह वर काढला त्याचे तुकडे केले आणि विहिरीत फेकून दिले. पोलिसांनी शुक्रवारी आरोपी महिला सूर्याबेनला अटक केली. तिने दिलेल्या जबाबानुसार तपासणी केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे देखील पोलिसांनी शोधून काढले. तिचा प्रियकर प्रताप फरार आहे.

पोलिस चौकशीत सत्य उघड
पोलिसांनी सांगितले, की रसाणा गावात राहाणारे अमराजी स्वरुपजी ठोकर (35) यांचा सूर्याबेनसोब 15 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. अमराजी एक महिन्यापासून बेपत्ता होता. जवळपास पंधरा दिवसांपूर्वी वडोदरा येथून त्याची बहिण गीताबेन त्यांना भेटाण्यासाठी गावी आली होती. तेव्हा सूर्याबनने तो कामा निमीत्त शहरात गेल्याचे सांगितले. मात्र बरेच दिवस होऊनही भाऊ परत न आल्याने गिताबेनने भाऊ हरवल्याची तक्रार पोलिसात दिली. पोलिसांनी सूर्याबेनकडे चौकशी केली तेव्हा तिने उडवा-उडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला. तिला ताब्यात घेऊन जेव्हा पोलिसी खाक्या दाखवण्यात आला तेव्हा तिने गुन्हा कबूल केला.

पोलिसांना काय-काय सांगितले
सूर्याबेनने पोलिसांना सांगितले, की एक महिन्यापूर्वी तिचा प्रियकर प्रताप आणि तिने अमराजी झोपेत असताना धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. घराजवळच शेतामध्ये त्याचा मृतदेह पुरला. मृतदेह कोणाला सापडेल या भीतीने त्यांनी तीन दिवसानंतर पुन्हा मृतदेह बाहेर काढला. कुर्हाडीने त्याचे बारीक तुकडे केले आणि विहिरीत फेकले. सूर्याबेनने सांगितले, की काही वर्षांपूर्वी तिच्या गावातीलच एका पुरुषासोबत तिचे संबंध वाढले. याची माहिती तिच्या पतीला झाली. त्यामुळे तिने प्रियकराच्या मदतीने पतीचा आपल्या मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा घटनेसंबंधी फोटो...
बातम्या आणखी आहेत...