आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियकाराने पतीवर केला सातव्‍यांदा वार, पत्नी म्‍हणाली -‘बस! आता नको’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिशीत आणि वेल्सी - Divya Marathi
दिशीत आणि वेल्सी
सूरत - शहरातील उच्‍चभ्रू वसाहत असलेल्‍या सर्जन सोसायटीमध्‍ये एका व्‍यक्‍तीचा त्‍याच्‍या पत्‍नीने प्रियकर आणि चालकाच्‍या मदतीने खून केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून, दिशीत जारिवाला (25) असे मृताचे नाव आहे.

काय आहे प्रकरण ?
दिशीत याचे काही वर्षांपूर्वी वेल्सी (22) नावाच्‍या युवतीसोबत लग्‍न झाले होते. या दाम्‍पत्‍याला एक मुलगीसुद्धा आहे. लग्‍नापूर्वीच वेल्‍सी आणि तिचा मामेभाऊ सुकेतू मोदी (26) यांचे प्रेमसंबंध होते. परंतु, त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी त्‍यांचे लग्‍न लावून दिले नाही. दरम्‍यान, सुकेतूचेही लग्‍न झाले. मात्र, या दोघांना एकत्र राहाचे होते. त्‍यातूनच त्‍यांनी वेल्सीच्‍या पतीचा खून केला.

पत्नी म्‍हणाली -‘बस! आता नको मारू ’
वेल्‍सीने पोलिसांना सांगितले, ''आम्‍ही एका महिन्‍यापूर्वीच दिशीतला ठार करण्‍याचा प्‍लॅन केला होता. शिवाय दरोडेखोरांनी हे कृत्‍य केले असे आम्‍हाला भासवायचे होते. त्‍यासाठी चालक धिरेंद्र चव्‍हाण याला पैशाचे अमीष देऊन त्‍याची मदत घेतली. दिशीतच्‍या छातीत पहिल्‍यांदा चालकाने चाकू खुपसला. त्‍यानंतर सुकेतूने सपासप वार केले. त्‍याने सातव्‍यांदा चाकू खुपसल्‍याने दिशीत रक्‍ताच्‍या थारोळ्यात पडला होता. हे मला पाहावले गेले नाही. त्‍यामुळे बस आता नको म्‍हणून मी त्‍याला थांबवले'', अशी कबुली तिने दिली.

पोलिसांना असा आला संशय
हे कृत्‍य दरोडेखोरांनी केले, अशी बतावणी वेल्‍सीने केली होती. मात्र, ज्‍या ठिकाणी हे हत्‍याकांड झाले ते ठिकाण खूप सुरक्षित आहे. शिवाय घरातील अर्धेच दागिने गायब होते. तसेच दिशीतच्‍या हातातील अंगठ्याही तशाच होत्‍या. त्‍यामुळे पोलिसांना वेल्‍सीवर संशय आला. तिला पोलिसी खाक्‍या दाखवताच तिने गुन्‍हा कबुल केला.
सीसीटीव्‍हीमध्‍ये दिसले आरोपी
आरोपी दिशीच्‍या घरात जाताना आणि घरातून बाहेर येताना सीसीटीव्‍हीमध्‍ये दिसले. पोलिसांनी हे फुटेज ताब्‍यात घेतले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा VIDEO
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)