आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेसमन पतीचा मर्डर करणाऱ्या पत्नीच्या हातावर प्रेमीचा टॅट्यू, वाचा धक्कादायक घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरत (गुजरात)- येथील प्रसिद्ध बिझनसमन दिशीत यांच्या खून प्रकरणी पत्नी वेल्सी आणि तिचा प्रियकर सुकेतू आणि ड्रायव्हर धीरेंद्र कोर्टात सादर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली आहे. यावेळी वेल्सीच्या हातावर सुकेतूच्या नावाचा टॅट्यू दिसला. यावरुन दोघे प्रेमात किती आकंठ बुडाले होते हे दिसून आले.
हिरानगरीतील उच्चभ्रू सर्जन सोसायटीमध्ये सोमवारी झालेल्या खूनाचा पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांमध्ये गुंता सोडवला आहे. बिझनेसमन दिशीतच्या खूनाच्या आरोपात पत्नी वेल्सीसह तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. वेल्सीने गुन्हा कबूल केला असून, तिनेच प्रियकराच्या (मामाचा मुलगा) मदतीने पतीचा मर्डर केला होता.

पोलिसांना पहिल्यापासून होता वेल्सीवर संशय
- दिशीतचा बंगला सोसायटीच्या अखेरच्या टोकाला होता, तेव्हा दरोडेखोरांनी हाच बंगला का निवडला ?
- दरोडेखोरांनी फक्त वेल्सीचेच दागिने का नेले. दिशीतचा खून झाला तेव्हा त्यांच्या गळ्यात सोन्याची साखळी आणि बोटात सोन्याची अंगठी देखील होती. दरोडेखोरांनी त्याला हात का लावला नाही ?
- जर घरावर दरोडा पडला होता तर घरातील लॉकरमध्ये ठेवलेले मौल्यवान दागिने आणि रक्कम का लुटली गेली नाही ?
- दरोड्याच्या इराद्याने आलेल्या लोकांनी फक्त दिशीतचाच खून का केला, आणि तोही एवढ्या निर्दयपणे. दिशीतच्या छातीवर चाकूचे आठ वार होते आणि गळादेखील कापला होता.

वेल्सीने पोलिसांना सांगितली ही कथा..
- या खून प्रकरणात पोलिसांना प्रथमपासून वेल्सीवर संशय येत होता. तिने सांगितलेली कथा त्यांच्या पचनी पडत नव्हती.
- वेल्सीने पोलिसांना सांगितले होते की रात्री साधारण 12 वाजता डोअरबेल वाजली. दिशीतने दरवाजा उघडला.
- समोर दोन जण उभे होते.त्यांनी दिशीतला धक्का देऊन दूर लोटले आणि घरात घुसले. त्यांच्या दोन्ही हातात धारदार चाकू होते.
- दरोडेखोरांनी माझे दागिने घेतले आणि मला व माझ्या मुलीला बेडरुमच्या बाथरुममध्ये बंद केले. त्यांनतर दिशीतचा मर्डर झाला.
- मी (वेल्सी) कशीबशी बाथरुमच्या खिडकीची काच तोडली आणि मदतीसाठी आवाज दिला. शेजारी आले आणि त्यांनी आम्हाला बाथरूमबाहेर काढले.

मामाच्या मुलासोबत अफेअर
- पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, वेल्सी आणि दिशीत यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली. त्यांना एक मुलगी आहे. मात्र वेल्सीचे तिच्या सख्या मामाच्या मुलासोबत अफेअर सुरु होते. त्यामुळेच वेल्सीने दिशीतचा काटा काढण्याचा प्लॅन तयार केला.

कसा केला मर्डर
- वेल्सीने सांगितलेल्या कथेवर पोलिसांचा पहिल्यापासून विश्वास नव्हता. त्यांना ती कथा बनावट वाटत होती.
- त्या रात्री वेल्सी दिशीत आणि मुलगी झोपण्याची वाट पाहात होती.
- रात्री साधारण 12 वाजता वेल्सीनेच दार उघडले आणि आरोपी बेडरुममध्ये दाखल झाले.
- त्यानंतर प्लॅननुसार वेल्सीने हलकेच मुलीला उचलेल आणि बाथरुममध्ये गेली.
- आरोपींनी बाथरुमचे दार बाहेरुन लावून घेतले. त्यानंतर झोपेत असलेल्या दिशीतवर चाकूने वार करण्यात आले. मर्डर केल्यानंतर आरोपी त्याच्याच कारने फरार झाले होते.

डॉग स्कॉड आणि एफएसएलची झाली मदत
- लूम कारखान्याचे मालक दिशीतचा फायनान्स आणि प्रॉपर्टी डीलिंगचा बिझनेस होता. शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींपैकी ते एक होते. यामुळे या मर्डरने पोलिसांची झोप उडाली होती.
- आरोपींचा शोध घेण्यासाठी डॉग स्कॉड आणि एफएसलची मदत घेण्यात आली होती.
- पोलिसांनी बंगल्याच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज चेक केले. त्यात दरोडेखोर दिसत होते, मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट नव्हते.
- दरोडेखोर ज्या ऑटो रिक्शाने आले होते, पोलिसांनी ती बुधवारीच जप्त केली होती. ऑटो चालकाने आरोपींचे वर्णन केले होते. पोलिसांनी ऑटो चालकाला अटक केल्याचे उघड केले नव्हते. तसे केले असते तर आरोपी सतर्क झाले असते.
- अखेर पोलिसांचा वेल्सीवर असलेला संशय खऱा ठरला आणि तिने गुन्हा कबूल केला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रक्ताने माखलेली दिशीतचे बेडरुम..
> सीसीटीव्हीत कैद झालेले दोन्ही आरोपी
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...