आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fashion Calendar: जेव्हा ग्लॅमरस मॉडेल्स कामगारासारख्या काम करतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद (गुजरात)- फॅशन फोटोग्राफर विजय काबरा यांनी 'श्रमण' म्हणजेच अंगमेहनतीचे काम या थीमवर ग्लॅमरस कॅलेंडर लॉंच केले आहे. यात मॉडेल्सना मेहनतीची कामे करताना दाखविण्यात आले आहे. रिअल लोकेशनवर हे फोटोशुट करण्यात आले आहेत. यातील मॉडेल्सनी आकर्षक कपडे परिधान केले आहे. या कपड्यांसह कामगारासारखे काम करणे, झाडू लावणे, मडकी तयार करणे आदी मेहनतीची कामे करताना या मॉडेल्सना दाखविण्यात आले आहे. अहमदाबादमधील दिल्ही दरवाजा, दरियापूर, दुधेश्वर, रिव्हरफ्रंट, लीलापूर गाव, माधुपुरा मार्केट आदी भागात याचे शुटिंग करण्यात आले.
याबाबत विजय काबरा म्हणाले, की आता महिला वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करीत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी पार पाडत आहेत. यासह कुटुंबाकडे लक्ष देतानाही महिला दिसतात. अशी दुहेरी भूमिका त्या बजावत असतात. ही बाब अधोरेखित करण्यासाठी या कॅलेंडरची थीम अशी ठेवण्यात आली आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या अनोख्या कॅलेंडरचे फोटो.....
बातम्या आणखी आहेत...