आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Saver Her Daughter Life From Crocodile In Vadodara. Latest News In Marathi

कपडे धुण्याच्या धोपटण्याने मगरीवर प्रहार करून आईने वाचवले मुलीचे प्राण!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा- एका वात्सल्यमूर्ती आईने आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी यशस्वी झुंज दिली. अंगावर शहारे आणणारी ही घटना गुजरातमधील पादरा तालुक्यातील सिकरिया मुबारक गावात घडली.

कांता वांकर ही 19 वर्षीय तरुणी आईसोबत विश्वामित्र नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. तेव्हाच अचानक एका मगरीने कांता तिचा पाय जबड्यात पकडला आणि तिला नदीत ओढू लागली. कांताने आरडाओरड करत मदतीसाठी याचना केली. कांताची आर्त ऐकून जवळच बसलेली आई दिवालीबेन तिच्याकडे धावत आली. तिने कांताचा हात घट्ट धरून ठेवला. मगरीच्या जबड्यातून मुलीला सोडवण्यासाठी दिवालीबेनने जवळच पडलेली कपडे धुण्याचे धोपटणे उचलून मगरीवर जोरदार प्रहार केला. तब्बल दहा मिनिटे चाललेल्या या लढाईत अखेर आई जिंकली. मगरीने जबड्यातून कांताचा पाय सोडला. कांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, वनखात्याने विश्वामित्र नदीतील मगरींची गणना केली होती. त्यानुसार नदीत 260 मगरी आहेत. त्यामुळे काठावरील रहिवाशांना नदीपासून दूरच राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा शूर आई-मुलीचे फोटो...