आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Rushed On Liquor Den And Held Sabotage In Gujarat

पत्नीला मारहाण, महिलांनी काठ्या घेऊन बंद केले दारू अड्डे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावी जेतपूर (गुजरात) - शिथोल(गुजरात) गावातील हे दृश्य. येथे एका मद्यपीने पत्नीला जबर मारहाण केली. हा प्रकार कळताच गावातील महिला प्रचंड भडकल्या. हाती काठ्या घेऊन ही नारीशक्ती बाहेर पडली आणि त्यांनी गावातील अवैध दारू अड्ड्यांवर थेट हल्लाबोल केला. हादरलेले दारू विक्रेते घरांना कुलूप ठोकून पसार झाले होते. मात्र, महिलांनी कुलपे तोडून दारूचे साठे नष्ट केले. थोड्या वेळाने पोलिसही पोहोचले. छापे टाकून त्यांनी शेकडो लिटर दारू जप्त केली. या प्रकारातून गुजरातमधील दारूबंदीचे बिंग मात्र फुटले.