आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या सुरक्षेला महिला पोलिस, महिला दहशतवादी पथकाकडून हल्ल्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर- गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर महिला आत्मघातकी दहशतवादी पथकाकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याभोवती आता महिला पोलिसांचेही कडे राहणार आहे.
यासंदर्भात गुजरात पोलिसांचे एक अधिकारी म्हणाले, की दहशतवादी संघटना नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याची दाट शक्यता आहे. गुप्तचर खात्याला तशी माहिती मिळाली आहे. गुप्तचार खात्याने गुजरात सरकारला आणि केंद्र सरकारला याबाबत सावध केले आहे.
विशेष म्हणजे महिला दहशतवाद्यांकडून नरेंद्र मोदींवर हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मोदींच्या सभेला महिलांची लक्षणिय गर्दी असते. अशा वेळी महिला दहशतवाद्यांकडून हल्ला होऊ शकतो. त्यामुळे आता महिलांमध्ये साध्या वेळातील महिला पोलिस बंदोबस्तास राहणार आहेत.
सध्या नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी एनएसजी आणि गुजरात पोलिसांचे तब्बल 45 कमांडो सुरक्षेसाठी लावण्यात आले आहेत. यासह इतर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
कुणाकडून आहे नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका, वाचा पुढील स्लाईडवर