आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yogesh Become Manvi Sex Change Surgery In Vadodara

सेक्स चेंज करुन झाली मुलगी, आता सर्जरीचा दिवसच असेल BIRTH DAY

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडोदरा (गुजरात) - गेल्या 30 मार्चला सेक्स चेंज करुन मुलाचा मुलगी झालेल्या 'मानवी'ने आता बर्थडेटही बदलली आहे. याबद्दल मानवीचे म्हणणे आहे, 'तसे तर माझी जन्मतारीख 27 एप्रिल होती, मात्र आता मी माझा वाढदिवस 30 मार्चला साजरा करणार. कारण, त्या दिवशी माझी सर्जरी झाली आणि मला नवे जीवन मिळाले.'

वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी शारीरिक बदल सुरु झाले...
योगेशची मानवी झालेल्या युवतीने सांगितले, 'भरूच मधील खोबला गावात माझा जन्म मुलगा म्हणून झाला. माझे नाव योगेश ठेवण्यात आले होते. माझ्या जन्मानंतर कुटुंबात मोठा आनंद साजरा झाला होता, घरच्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. सुरुवातीची चार-पाच वर्षे सर्वकाही नॉर्मल होते. त्यानंतर माझ्या शरीरात बदल होत गेले. मला शर्ट-पँट नाही तर फ्रॉक परिधान करणे आवडू लागले होते. मी नेहमीच मुलींच्या कपड्यांना पसंती देत होते. यामुळे माझे कुटुंबियांसोबत खटकेही उडायचे. मात्र मी स्वतःला मुलगीच मानत होते. मात्र तरीही, कुटुंबियांच्या मर्जीनूसार हायस्कूल ते कॉलेजपर्यंतचे शिक्षण मी एक मुलगा म्हणूनच पूर्ण केले.'
पुढील स्लाइडमध्ये वाचा, योगेशची मानवी होण्याची कथा...