आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आई, मी कॉलेजला जाते\', असे सांगून घरुन निघाली तरुणी, हॉटेलमध्ये सापडला मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- तरुण आणि तरुणीने हॉटेलमध्ये रुम बुक केली तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज.)
अहमदाबाद- मी कॉलेजला जाते, असे सांगून एक तरुणी घरुन निघाली. पण तिचा मृतदेह एका हॉटेलमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. एका तरुणासोबत ही तरुणी या हॉटेलमध्ये आली होती. तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तिच्यासोबत आलेल्या तरुणाचा पोलिस शोध घेत आहेत.
या तरुणीचे नाव रचना प्रजापती तर तिच्यासोबत आलेल्या तरुणाचे नाव कृष्णा वसय्या आहे. दोघे नवगुजरात या कॉलेजमध्ये पदवी शाखेच्या अंतिम वर्षाला आहेत. रचनाला एक मोठी बहिण आणि लहान भाऊ आहेत. मोठ्या बहिणीने एलएलबी केले आहे तर भाऊ मोबाईल रिपेअरिंग स्टोअरमध्ये काम करतो.
अहमदाबादच्या राणीप पोलिस स्टेशनपासून काहीच अंतरावर किंग पॅलेज नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये काल (बुधवार) सकाळी सात वाजता रचना आणि कृष्णा येथे आले. त्यांनी एक खोली बुक केली. याचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग पोलिसांना मिळाले आहे. त्यानंतर दोघे 107 क्रमांकाच्या खोलीत गेले. सकाळी 10 वाजता कृष्णा खोली सोडून निघून गेला. त्यानंतर एक सफाई कर्मचारी खोलीसमोर आला तर त्याला दार उघडे दिसले. त्याने आत डोकावून बघितले तर रचना बेडवर निपचित पडलेली होती. त्याने हॉटेलच्या मालकाला ही बाब सांगितली. त्याने पोलिसांना फोन केला. या रचनाचा खून झाला असल्याचे पोलिस आल्यावर सिद्ध झाले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, घटनास्थळाचे फोटो....