आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Woman Earning 1.85 Lacks From Dairy Farming In Gujarat

शिक्षिकेची नोकरी सोडून तरुणीने केला दुधाचा व्यवसाय, मासिक उत्पन्न 1.85 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालनपूर येथील राठोड कुटुंबातील तरुणीने हिंदीत एमए आणि बी. एड. केल्यानंतर शिक्षिकेची नोकरी केली. पण नोकरीत काही मन रमत नव्हते. तिला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता. तिची आजीही दुधाच्या व्यवसायात होती. अखेर तिने हिंमत पक्की केली. नोकरीला रामराम ठोकला. दुधाचा व्यवसाय सुरु केला. आता ती महिन्याला तब्बल 1.85 लाख रुपये कमविते.
या तरुणीचे नाव मंदाकिनी राठोड असे आहे. तिने वडीलांकडून 60 हजार रुपये कर्ज घेतले. त्यानंतर पालनपूर तहसिलमधील वासण गावात जमीन भाड्याने घेतली. तेथे गाई-म्हशींचा गोठा उभारला. आता हा या गोठ्यात अनेक गाई म्हशी आहेत. यांत्रिकी पद्धतीने दुध काढले जाते. वेगवेगळ्या गोष्टींसाठी यंत्रांची मदत घेतली जाते. मंदाकिनीचे मासिक उत्पन्न आता तब्बल 1.85 लाख रुपयांवर गेले आहे.
मंदाकिनीला मिळाले पाच अवॉर्ड
मंदिकिनीचे पती नवीन राठोड माणकी गावातील विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. 2014 मध्ये मंदाकिनीला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते गुजरात श्रेष्ठ पशुपालक कृषिरत्न अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले होते. 2015 मध्ये बनासकांठा जिल्हा स्तरावरील महिला पुष्प अवॉर्ड, आणंदमध्ये डॉ. एन. एस. पटेल दुध उत्पादन अवॉर्ड आणि ऑल गुजरात उद्योग अवॉर्डने तिला सन्मानित करण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, बैलगाडीवर बसून दुध वाटायला जाते मंदाकिनी... असे यांत्रिकी पद्धतीने केले जाते काम....