आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Killed Girlfriend Over Trivial Issue In Gujarat

Killer Love: 7 वर्षांपासून होते अफेअर, रिलेशनला ती म्हणाली नाही, त्याने दाबला गळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा (गुजरात)- 22 वर्षीय रुद्रा पंड्याचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी तिच्या कारमध्ये पोलिसांना आढळून आला. या प्रकरणी हरपाल किरीट पटेल याला अटक करण्यात आली आहे. हे दोघे गेल्या सात वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. परंतु, आता रुद्राने रिलेशनशिप कायम ठेवण्यास नकार दिला होता. यामुळे चिडलेल्या हरपालने कारमध्येच गळा दाबून रुद्राचा खून केला.
रुद्रा पंड्या इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होती. पोलिसांच्या प्रायमरी अहवालात सिद्ध झाले आहे, की तिचा खून दुपट्ट्याने गळा आवळून करण्यात आला. शनिवारी रात्री हरपालने रुद्राची भेट घेतली होती. यावेळी दोघे कारमध्ये बसले होते. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरु होती. यावेळी रुद्राने त्याच्यासोबत रिलेशनशिप कायम ठेवण्यास नकार दिला. त्यावर हरपाल चिडला. त्याने लगेच ओढणीने तिचा गळा आवळला. यातच तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी हरपाल विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. हरपालनेही खून केल्याची कबुली दिली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, कारमध्ये सापडला होता रुद्राचा मृतदेह...